प्राथमीक शिक्षकाचा असाही प्रमाणीकपणा ! बॅंकेकडुन आलेले जास्तीचे एक लाख रुपये केले परत !
पनवेल / संतोष आमले
पैशाचा मोह जगात कोणालाही सुटलेला नाही .पैशापायी माणूस वेळप्रसंगी रक्ताची नाती गोती हे विसरतो मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हेवाडी येथील प्राथमिक शिक्षकाने चक्क एक लाख रूपये बँकेचे जास्तीचे आलेले दुस-या दिवशी बँकेत नेऊन देऊन प्रामाणीपणा दाखवला आहे.
अहमदनगर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील प्राथमिक शिक्षक बापू गोवर्धन बोरुडे यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा टाकळी काझी यांच्याकडून पीककर्ज नवे जुने केले हाेते .त्यांना बँकेकडून भरलेले पीककर्ज पुन्हा नव्याने मिळाले मात्र हे कर्ज घेत असताना बँकेच्या कॅशियर कडुन घाईगडबडीमध्ये त्यांना चक्क एक लाख रुपये जास्तीचे आले .प्रदीप बोरुडे यांनी ते मोजले नाही .ते तसेच घरी आले व संध्याकाळी पैसे मोजत असताना त्यांच्या लक्षात आले की बँकेकडून आपल्याला एक लाख रुपयांची रक्कम जास्तीची आलेली आहे .त्यांच्यातील प्रामाणिकपणा जागे झाला व सकाळी तडक ते बँकेत गेले व बँकेतील मॅनेजर व कॅशियर शी संपर्क साधून त्यांना सांगितले की तुमचे एक लाख रूपये माझ्याकडे जास्तीचे आले आहेत .व त्यांनी ते बँकेला सुपूर्द केले .
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमी प्रामाणिक पाणाचे महत्त्व समजून सांगत असतो मात्र प्रदीप बोरुडे या प्राथमिक शिक्षक काने बँकेकडून आलेले पाच दहा हजार रूपये नव्हे तर चक्क एक लाख रु आपल्यातील प्रामाणिकपणा जागृत ठेवून परत केले आहे व कृतीतून त्यांनी समाजाला एक आगळा वेगळा संदेश दिला आहे .
त्यांच्या मनामध्ये जर पैशाचा मोह आला असता तर ते पैसे स्वतःजवळ ठेवू शकले असते .मात्र आई वडिलांची शिकवण आणि शिक्षक पेशीतील प्रामाणिकपणा त्यांच्यातील जागृत झाला .आणि त्यांनी ही रक्कम स्वत हून जाऊन बँकेकडे सुपूर्द केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्या या कृतीचे अभिनंदन होत आहे .
प्रामाणिकपणा दाखवून एक लाख रुपये परत केल्याबद्दल बँकेचे मॅनेजर व कॅशियर यांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली .जर प्रदीप बोरुडे या प्रामाणिक शिक्षकाने ही रक्कम परत केली नसती तर कॅशियरला स्वत: च्या पगारातून ती रक्कम भरावे लागलीअसती .असे प्रामाणिकपणा दाखवणारे समाजामध्ये फार थोडे लोक आहेत .हा प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे समाजातील अनेक स्तरातून त्यांचे फोन संदेशाद्वारे व प्रत्यक्षात भेटून अभिनंदन केले आहे.