बुलढाणा येथे व्ही. सि. ए.ची 14 वर्षांवरील ते खुला गटा करिता महिला क्रिकेट निवड चाचणी चे आयोजन
मलकापूर दि.23/4/2022 विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर द्वारा आयोजित विदर्भातील सर्व जिल्हातील ग्रामीण व शहरी विभागातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी व त्यांचा गुणवत्तेला न्याय देण्यासाठी बुलढाणा जिल्हा मध्ये विदर्भ क्रिकेट संघटना महिला व मुली साठी क्रिकेट निवड चाचणी सहकार विदया मंदिर बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे.
या निवड चाचणी 14 वर्षा वरील व16,19,23, वर्ष व खुला गटा करिता, cut of date. 1/09/2008 नंतर जन्मलेले असणाऱ्या महिला/मुलींची क्रिकेट खेळाडूंची विदर्भ क्रिकेट संघटने तर्फे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणी करीता नागपूर येथून महिला निवड समिती चे सदस्य येणार असून वरील निवड चाचणी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा फी आकारण्यात येणार नाही. याची सर्व खेळाडूंनी आणि पालकांनी नोंद घ्यावी हि निवड चाचणी सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे दि. 28/04/2022 रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत व दुपारी4.30 ते 6. पर्यंत घेण्यात येणार आहे.
तरी महिला क्रिकेट खेळाडूंनी आपल्या क्रिकेट चे साहित्य व पांढऱ्या पोशाखा सह ,ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र,आधार कार्ड, बोनाफाईड सर्टिफिकेट सह सहकार विद्या मंदिर मध्ये राजेश ढाले सर यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन व्ही सी ए चे जिल्हा समिती चे (अध्यक्ष) नितेश उपाध्याय सर तसेच व्ही. सी. ए. चे बुलढाणा क्रिकेट कमिटी चे ( अध्यक्ष ) किशोर वाकोडे, संयोजक इम्रान खान, मोहम्मद साबीर, राहुल जाधव, सुरेश बोबडे यांनी केले आहे.