भरारी फाऊंडेशन आयोजित “बहिणाबाई महोत्सव” ला खासदार रक्षाताई खडसे यांची सदिच्छा भेट
जळगाव येथे भरारी फाऊंडेशन आयोजित “बहिणाबाई महोत्सव” ला काल रात्री माजी मंत्री आ.श्री.गिरीषजी महाजन व जिल्ह्यातील भाजपा नेतांसह भेट देऊन, आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावली व यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जळगांव शहरातील सागर पार्क येथे “भरारी फाऊंडेशन” तर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक - व्यावसायीक माहिती देणारे स्टॉल लावण्यात आलेले असुन यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते.
यावेळी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांचा माजी मंत्री आ.श्री.गिरीषजी महाजन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिला सक्षमीकरणाचा असा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांची माजी मंत्री आ.श्री.गिरीषजी महाजन, माजी आमदार श्री.चैनसुख संचेती, खा.श्री.उन्मेषदादा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.श्री.राजुमामा भोळे, आ.श्री.मंगेश चव्हाण यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.