मलकापूर मतदार संघातील पोलीस प्रशासकीय इमारती व शासकीय निवासस्थाने अद्यावत करणार
पोलीस अधीक्षक,बुलढाणा यांच्या अधिपत्याखालील पोलीस स्टेशन मलकापूर शहर व ग्रामीण येथील प्रशासकीय इमारत व शासकीय निवासस्थान बांधकाम करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज मा.ना.श्री.दिलीपजी वळसे पाटील,गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना दि.२६ एप्रील रोजी दिले.
या निवेदनात,पोलीस अधीक्षक,बुलढाणा यांच्या अधिपत्याखालील पोलीस स्टेशन,मलकापूर शहर व ग्रामीण येथील प्रशासकीय इमारत व शासकीय निवासस्थानाचे बांधकाम हे फार वर्षापूर्वीचे अतिशय जुने / शिकस्त झाल्याने तेथील शासकीय निवासस्थानाची फार मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे,त्यामुळे शासकीय निवासस्थानाचा वापर करणे धोकादायक होवू शकते,तसेच बुलडाणा जिल्हा पोलीस दलात सतत होत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रात्याक्षिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पोलीस स्टेशन मध्ये वितरीत केले जातात त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्येत वाढ होत असुन तेथील प्रशासकीय इमारत व निवासस्थाने राहण्यास अपूरी पडत आहेत,त्यामुळे पोलीस स्टेशन अंतर्गत प्रशासकीय इमारती व शासकीय निवासस्थाने तसेच बॅरेक बांधकामाची आवश्यकता आहे,मलकापूर शहर १२९ व मलकापूर ग्रामीण ३० येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी असे मंजुर मनुष्यबळ आहे,तरी मलकापूर शहर व ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी मंजुर संख्याबळाच्या ७०% प्रमाणे शासकीय निवासस्थान व प्रशासकीय इमारत तसेच बॅरेक बांधकाम करण्यात यावे असे नमुद आहे..!!