विजय गव्हाडला न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी
नांदुरा (प्रतिनिधी)- जनतेच्या आशेवर पाणी फिरवून दोन वर्षापासून फरार असलेल्या विजय • गव्हाची आज पोलीस कोठडी संपली असता त्याला ● नांदुरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी बुलडाणा कारागृहात करण्यात आली आहे. युवाशक्ती जागरण मंच विदर्भ मुख्यालय बडनेर भोलजी या नावाने संस्था स्थापन करून गावागावात महिलांचे बचतगट निर्माण करणे व त्याअंतर्गत कमी किंमतीमध्ये वस्तू देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये जमा करून ठरलेल्या वस्तून
दिल्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार विजय गव्हाइला नांदुरा पोलिसांनी तब्बल दीड ते २ वर्षांनंतर अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आधी ३ दिवसांची तर नंतर 9 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. २१ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालया समीर हजर केले विजय गव्हाड याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून बुलडाण जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक भूषण गावंडे यांचे मार्गदर्शन एपी आय प्रविण महाजन करीत आहेत.