हिंदी मराठी पत्रकार संघाचे नियुक्ती सोहळा मोठ्या थाटात साजरा
बुलढाणा जिल्ह्यात पत्रकार हा घटक असुरक्षित आहे समाजात होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा घटकच आजच्या काळात असुरक्षित आहे पत्रकारांवर अन्याय अत्याचारचे प्रमाण संपूर्ण देशात अधिक वाढले आहे व त्याची दखल शासनाने घ्यावी व पत्रकार हा कसा सुरक्षित होऊन अजून नव्या जोमाने समाजात होणाऱ्या अन्यायाला शासन दरबारी मांडून त्याला वाचा फोडण्याचे काम करेल व पत्रकार काम करण्यासाठी स्वतःच्या हक्काचे पत्रकार भवन,पत्रकाराला व त्याच्या कुटुंबाला राहण्यासाठी स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देण व अहोरात्र फिल्ड वर्क करत असताना झालेल्या अपघातात त्याला विमा कवच देणें, त्याच्या मुलाबाळांना उच्च शिक्षण प्राप्त करून देणे अशे अनेक उधिष्टे घेऊन हिंदी मराठी पत्रकार संघाचे आज दिनांक 28 रोजी बुलढाणा जिल्ह्यात नियुक्त सोहळा संपन्न झाला
यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या हस्ते या नियुक्ती सोहळ्या दरम्यान श्रीकृष्ण तायडे यांना विदर्भ समन्वयक,गौरव खरे यांना जिल्हाध्यक्ष ,कृष्णा मेहसरे यांना जिल्हा प्रवक्ता , स्वप्नील अकोटकार यांना जिल्हा सचिव, अजय टप यांना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,उल्हासभाई शेकोकार यांना तालुकाध्यक्ष,अनिल गोठी यांना तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत यांना तालुका सचिव, प्रा प्रकाश थाटे यांना कोषाध्यक्ष, बळीराम बावस्कर यांना शहर सदस्य, शेख निसार यांना जिल्हा संघटक, पदी नियुक्ती देण्यात आल्या तर या संगघटनेच्या नेतृत्वात जोमाने काम करत पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या घटकावर समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देऊ व समाजात वावरताना पत्रकाराला सुरक्षित या संघटनेच्या माध्यमातून करू अशे प्रतिपादन तालुकाध्यक्ष उल्हासभाई शेकोकार व जिल्हाध्यक्ष गौरव खरे यांनी केले व जिल्हा सचिव स्वप्नील अकोटकार यांनी सांगितले की अनेक संघटना आल्यात पण ज्या पद्धतीने फक्त पद घेऊन कुठेही कामात न येणाऱ्या लोकांन प्रमाणे आपण न करता आपल्याला खंबीर नेतृत्व करायचे आहे असे मत व्यक्त केले व नियुक्ती सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.