Breaking News
recent

गोठ्याला आग लागून दहा जनावरांचा मृत्यू तर 16 जनावर गंभीर जखमी.



मेहकर तालुका प्रतिनिधी ,शिवशंकर मगर 

तालुक्यातील भोसा येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर खूरद नितीन खुरद यांचा  शेतातील गोठ्याला आग लागून 10 जनावरांचा मृत्यू झाला तर 16 जनावर गंभीर जखमी झाल्याची घटना 30 एप्रिल च्या दुपारी दोन वाजे दरम्यान घडली   प्रभाकर खुरद व नितीन खुरद या शेतकऱ्यांचा दृगबोरी रस्त्यावर गुरांचा गोठा होता त्या गोठ्यामध्ये गाय बैल म्हैस वासरू अशी 25 जनावर दुपारी उन्हामुळे बांधलेली होती  30 एप्रिल च्या दुपारी दोन वाजेच्या दरम्यान डोंगर पट्ट्या कडून आलेल्या आगीने गोठ्याजवळ रौद्ररूप धारण केल्यामुळे प्रभाकर खुरद व नितीन खुरद यांच्या गोठ्यातील सात बैल दोन गिर गाय एक वासरू या जनावरांचा होरपळून मृत्यू झाला

         तर इतर पंधरा जनावर होरपळून गंभीर जखमी झाली आहेत तसेच गोठ्यातील इतर शेतीचे साहित्य गोठा बांधकामासाठी आणलेले सिमेंट 25 बॅगजळून खाक झाल्या आहेत तर स्प्रिंकलर चे पाच संच देखील जळाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.   सदर घटनास्थळाला नायब तहसीलदार अजय पिंपरकर तलाठी आदींनी भेट देऊन पंचनामा केला आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ होत आहे. सकाळी झाला होता चुलत भावाचा विद्युत शॉक लागल्यामुळे मृत्यू 30 एप्रिल च्या सकाळी प्रभाकर खुरद यांचे चुलत बंधू सहदेव नामदेव खुरद वय 45 हे आपल्या घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना त्यांना विद्युत शॉक लागला होता त्यांना उपचारासाठी मेहकर येथे खुरद परिवारातील नातेवाईक घेऊन आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सर्व परिवार पंचनामा करण्यासाठी मेहकर येथे उपस्थित होते त्याचवेळी त्यांच्या भोसा गावातील गोट्याला आग लागल्याची घटना घडली.


Powered by Blogger.