Breaking News
recent

सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचा स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड 2022 द ग्रॅण्ड लिगसी रिसॉर्टवर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न


प्रतिनिधी मलकापूर


    सेव्हन स्टार न्युज चॅनलचा राज्यस्तरीय स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड  वितरण सोहळा महाबळेश्वर येथील द ग्रँड लेगन्सी या ठिकाणी अनेक  दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला.  हा सोहळा खडतर प्रवासातून यशाला गवसणी घातलेल्या विविध क्षेत्रातील मातब्बर आणि कर्तृत्ववान व्यक्तींना देण्यात आला. तब्बल 32 व्यक्तींना या कार्यक्रमात शानदार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे प्रादेशिक पी.एफ.आयुक्त पुण्याचे सचिन बोराटे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यसंघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, तसेच 'सेव्हन पिएम हेल्थकेअर' कंपनीचे संचालक गिरीश आरोंदेकर यांची

  यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, शेतकरी, उद्योजकता यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत संघर्षमय प्रवास करून यशाचं शिखर गाठलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून चॅनेलच्या माध्यमातून  "राज्यस्तरीय स्कायस्क्रॅपर स्टार अवॉर्ड"हा प्रतापशेठ साळुंखे, अपर्णाताई देशमुख, डॉ. कृष्णत चन्ने, कपिल ओसवाल, शांतारामशेठ शिंदे, सविता जाधव, अशोकराव मोरे, समीर इनामदार, प्रदीप भिंताडे, प्रकाश सपकाळ, प्रा.अस्लम शिकलगार, डॉ. गणेश यमगर, विनोद साळुंखे, राजूशेठ जानकर, प्रा.आनंद गिरी, प्रा. मेजर पांडुरंग शितोळे, डॉ.उदयसिंग हजारे, प्रा. यु. टी. जाधव, शकील पटेल, संपतराव गावडे, सुभाष देवकाते, संतोष देशमुख, किशोर बडगुजर, हणमंत पवार, पै.संतोष वेताळ, अविनाश माने, प्रवीण करडे, पवनकुमार पोळ, विकास थोरात, हेमा पाकले, नवनाथ जाधव, कु.श्रेयस सगरे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

Powered by Blogger.