अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीची कुलदैवत आई अंबा देवी येथे महाआरती संपन्न.
अमरावती प्रतिनिधी/हिमांशु मिसे:
आज दिनांक २४/५/२०२२ रोजी मनसे नेते मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अंबादेवी येथे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धिरज तायडे यांच्या नेतृत्वात व महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. आरतीच्या वेळेस मनसेचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते यावेळी महाआरती करून उपस्थित सर्व भक्तांना लाडू चे वाटप करून अमित साहेबांना वाढदिवस निमित्त आशीर्वाद शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी महानगर अध्यक्ष संतोष, बद्रे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धिरज तायडे, शहर संघटक प्रवीण डांगे, शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, महिला सेना जिल्हा अध्यक्ष रीना ताई जुनघरे उपाध्यक्ष सचिव बबलू आठवले नितेश शर्मा उपाध्यक्ष रुद्र तिवारी विभाग अध्यक्ष सुरज बरडे महिला उपाध्यक्ष निर्मलाताई बोंडे, उपाध्यक्ष आदेश इंगळे, विभाग अध्यक्ष पवन गोंडे मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.