कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान" महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी डॉ योगेश पटणी ह्यांची निवड
भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश तर्फे सुरू असलेल्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या ५१ व्या कॅम्प चें उदघाटन काल दि. २७ एप्रिल २०२२ ला नाशिक येथे मा.ना.श्री. गिरीशजी महाजन व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. चित्राताई वाघ ह्यांच्या हस्ते संपन्न झाले. हे अभियान २६ जानेवारी ते १५ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे ज्यामध्ये १५१ कॅम्प घेऊन २१००० रुग्णांची मोफत कॅन्सर तपासणी करण्याचे लक्ष्य आहे. ह्या कार्यक्रमावेळी ह्या संपूर्ण कॅन्सरमुक्त अभियानाचे महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून भाजप जैन प्रकोष्ठ चे प्रदेश सह सचिव डॉ योगेश पटणी ह्यांची निवड करण्यात आली. ह्या निवडीबद्दल मा.आ. गिरीशजी महाजन, मा. चित्राताई वाघ,भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष मा. संदीपदादा भंडारी, प्रदेश सरचिटणीस मा. देवयानीताई फरांदे, मा.आ. राहुलभाऊ ढिकले, मा. लक्ष्मणजी सावजी, शहर अध्यक्ष मा. गिरीशजी पालवे , महिला आघाडी प्रमुख इशाताई कोळेकर ह्यांच्या हस्ते डॉ. योगेश पटणी ह्यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई विभाग व उत्तर महाराष्ट्र विभाग मधील अभियान संपन्न झाल्यावर ह्या अभियानाची सुरुवात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात प्रवेश द्वारी मलकापूर येथून होणार आहे.. भाजप जैन प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष संदीपदादा भंडारी ह्यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ह्या भव्य अभियानाची प्रदेश समन्वयक म्हणून निवड झाल्यावर सर्व स्तरातून डॉ पटणी ह्यांचे अभिनंदन होत आहे.