राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार शिवाजी खंदारे यांना जाहीर
प्रतिनिधी
जालना- मंठा तालुक्यातील किर्ला येथील शिवाजी पुंजाराम खंदारे यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणी संवर्धन अभियान महाराष्ट्र राज्य, जिल्हा सांगली वन विभाग, सांगली जिल्हा व जिल्हा प्राणी क्लेश प्रतीबंधक सोसायटी, सांगली यांच्या विद्यमाने पर्यावरण संवर्धन व पशुपक्षी संवर्धन ही काळाची गरज याविषयी चांगले काम करणाऱ्या व्यक्तिला हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.