Breaking News
recent

उद्योजक प्रितम मुथा यांच्याकडून पीआय खांडेकर-सुरवसे यांचा सत्कार.



प्रकाश सातपुते गंगापुर प्रतिनिधी

    शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेत बदली झाल्याने त्यांना वैजापूर मर्चंट बॅंकेचे संचालक तथा युवा उद्योजक प्रीतमकुमार मुथा यांनी सम्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला  आहे. दरम्यान नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांचा देखील पोलीस चौकीत जाऊन प्रीतमकुमार मुथा यांनी स्वागत सन्मान केला. २९ जुलै २०२० रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी एक वर्ष १० महिने शिल्लेगाव ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून अत्यंत पारदर्शकपणे कायदा व सुव्यवस्था राखत राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात एक मनमिळाऊ अधिकारी म्हणून ओळख निर्माण केल्याची सर्वांच्या तोंडावरून चर्चा व्यक्त होत आहे .

    काल त्यांचा पोलीस प्रशासनाकडून वाजत-गाजत पोलिस चौकीकडून निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला होता. बुधवारी सायंकाळी प्रीतमकुमार मुथा यांनी त्यांना निरोप समारंभ देण्यासाठी वैजापूर मर्चंट बँकेत निमंत्रित केले होते यावेळी श्री खांडेकर यांनी सर्व क्षेत्रातील लोकांनी पोलीस प्रशासनास केलेले सहकार्य विसरता येणार नाही असे सांगून मी पीआयचे प्रमोशन झाल्याबरोबर २९ जुलै ला शिल्लेगाव ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्ती ला आळा घालण्यासाठी प्रत्येक वेळी काठीचा धाक आवश्यक नसतो शब्दाच्या माराने देखील गुन्हेगारांमध्ये बरीच सुधारणा होते असा विश्वास व्यक्त करुन आयोजक प्रीतमकुमार मुथा यांच्या वैयक्तिमहत्वा बद्दलही त्यांनी तोंड भरून कौतुक केले.

याप्रसंगी जेष्ठ व्यापारी मदनलाल लोढा,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भरत पाटणी,माजी उपसरपंच गणेश व्यवहारे,ग्रामपंचायत सदस्य नारायण ठोळे,राजाभाऊ गायकवाड,नितीन कांजुणे,अमोल शिरसाट, विनोद बनकर,कल्पेश गायकवाड,विकी मढीकर,अजय जैस्वाल,शशशिकांत सांगवीकर,पोलीस पाटील विनोद त्रिभुवन,मुकेश भाटीया,संदीप आमरावसह ग्रामस्थ उपस्थित होते.



Powered by Blogger.