Breaking News
recent

रामा मेहसरे व विजय सावळे निर्मिती" माझी जान " या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर केले राज्य

 


मलकापूर : दिनांक 13 मे रोजी "माझी जान" हे मराठी गाणे रिलीज झाले.काही तासांमध्येच फक्त तीन दिवसात हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी बघून लाईक केले आहे. सदर गाण्याच्या चित्रीकरण व बोलाने परिसरातील तरुणांना मंत्रमुग्ध केले आहे. तरुणवर्ग,संगीत कलाक्षेत्रात रस असणारा कालाप्रेमी वर्ग यासह इतर चाहत्यांनीही "माझी जाण" या गाण्याला फक्त तीनच दिवसात हजारोंच्या संख्येत लाईक केले असून चहत्यां वर्गाचा अतुलनीय असा उच्चांक गाठला आहे. प्रत्येकाच्या तोंडावर गाण्याचे बोल तर आहे. काहीतर या गाण्याच्या रोमँटिक सांगितावर अधून मधून ठुमका सुद्धा घेत आहेत.

        कमी वेळात मिळालेला या यशाला पाहून निश्चित म्हणता येईल की यश,पैसा, नाव, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मेहनत, इच्छाशक्ती, आत्मविश्वास, जिद्द व सकारात्मक दृष्टिकोनाची गरज असते. मग परिस्थिती कशीही असली तरी यशाचा महामेरू निर्माण करणारा समुदाय यांपासून यश कधीच लांब राहत नाही. असेच यश बुलढाणा जिल्ह्यातील  मलकापूर शहरातील काही नव तरुणांनी "माझी जान" या मराठी गाण्याचे चित्रीकरण व निर्मिती करून मिळवले आहे. गाण्याच्या या यशामुळे व चाहत्यांच्या लाईक मुळे गाण्याची निर्मिती करणारे रामा मेहसरे व विजय सावळे यांच्यासह सर्व कलाकारांचा आनंद गगणाला पोहचला आहे.

रामा मेहसरे यांची प्रतिक्रिया

             मी ग्रामीण भागातील तरुण असून कला क्षेत्राची मला आवड असल्याने या क्षेत्रात मला काही निर्मित करता येते काय यासाठी मी प्रयत्नशील होतो.  माझ्या परिसरातीलच सुभाष बावस्कार,संतोष बोरगावकर, जि.ओ जाधव यांच्या प्रेरणेतून तसेच प्रगल्भ इच्छाशक्ती, जिद्दीच्या जोरावर "माझी जान" या गाण्याची मी निर्मिती करु शकलो. निश्चितच ग्रामीण भागातील तरुणांना वाव  देण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. माझा आत्मविश्वास व मला प्रेरणा देत असणारा समुदाय या सर्वांच्या आशीर्वादाने "माझी जान" या माझ्या मराठी गाण्याचे हे यशस्वी पाऊल वाट आहे. त्यामुळेच  माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.फार अल्प वेळात हजारोंच्या संख्येत प्रेक्षकांनी लाईक केल्याने मी प्रेक्षकांचा ऋणी आहे. या ऋणाची परतफेड करण्यासाठी येणाऱ्या काही दिवसातच सर्व चाहत्या वर्गाकडून आशीर्वाद घेऊन मराठी चित्रपट निर्मिती करण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील सुद्धा आहे. "माझी जान" या गाण्याप्रमाणेच किंवा त्याहीपेक्षा दर्जेदार मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची मी प्रेक्षकांना ग्वाही देतो.

         दि 8 एप्रिल रोजी" माझी जान" गाण्याचा शुभ मुहूर्त संपन्न झाला होता. सदर शुभमुहूर्त कार्यक्रमात सुभाष बावस्कार, डॉक्टर जि.ओ जाधव, मिलिंद डवले, बंडूभाऊ चौधरी,राजू पाटील, हरिभाऊ गोसावी, प्रा कृष्णा मेसरे, प्रा डॉ पी एन लढे आदी मान्यवरांच्या हस्ते शुभमुहूर्त कार्यक्रम संपन्न झाला होता. तदनंतर गाण्याची शूटिंग शहरातील मुख्य रस्ता,आठवडी बाजार, इंगवले यांचे फार्म हाऊस येथे केले गेले होते.आज दिनांक 13 मे रोजी "माझी जान" मराठी गाणे दुपारी 3 च्या दरम्यान  रिलीज झाले आहे. सदर गाण्याची निर्मिती रामा मेहसरे व विजय सावळे यांनी केली आहे.गाण्याचे बोल विजय सावळे यांनी लिहिले असून, अंकुश मुसळे यांनी गायले आहे.  रेकॉर्डिंग सुरमई स्टुडिओ भुसावल येथे झाले आहे.मुख्य अभिनय पियुष सराफ व आर माहेश्वरी यांनी केला आहे. संदीपसिंह राजपूत, सागर ढोकणे, गजानन शिवदे,वैभव वाघ यांनी सहकलाकार म्हणून भूमिका साकारली आहे.गाण्याचे डायरेक्टर म्हणून रामा मेहसरे यांनी काम पाहिले आहे. मेकअप आर्टिस्ट म्हणून महेश गणगे,  कॅमेरामन म्हणून सागर पाटील (विराट), यासह कृष्णा सावळे, आकाश नायसे इत्यादींनी महत्त्वपूर्ण कामगिरी सदर गाण्याच्या निर्मितीसाठी केलेली आहे. काही तासात मिळवलेल्या या यशाला पाहून असे म्हणता येऊ शकते की फार कमी दिवसात चाहत्यांची संख्या लाखो-करोडोंच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रामा मेहसरे यांच्या प्रयत्नाला सर्व स्तरातून भरभरून शुभेच्छा व कौतुक होत आहे. यांच्या प्रयत्नाला व भविष्यात निर्मित होणाऱ्या मराठी चित्रपटाची प्रतीक्षा सर्व चाहतावर्ग करत असल्याचे चित्रही दिसत आहे. एवढेच काय तर रामा मेहसरे यांना भविष्यात निर्माण होणाऱ्या मराठी चित्रपट निर्मितीसाठी(प्रोउन्सर ) अनेकांनी इच्छा सुद्धा दर्शविली आहे.

Powered by Blogger.