डॉ. दिपेश पष्टे यांच्या डॉ. देवेंद्र ओहरा कनिष्ठ महविद्यालयातील व्याख्यानात विद्यार्थी मंत्र मुग्ध !
संगमनेर ( प्रतिनिधी ) -
संगमनेर शहरातील एक उपक्रमशील ज्युनिअर काँलेज अशी ओळख असलेले दि.ग. सराफ विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा ज्युनियर काँलेज होय .
याच कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ. दिपेश पष्टे यांचे भारतीय संविधान , राज्य घटना व मानवी अधिकार व कर्तव्य यात विद्यार्थ्यांची भूमिका या विषयावर व्याख्यान झाले.यात विद्यार्थी अगदी मंत्र मुग्ध झाले आहे.
उपस्थितांचे स्वागत उपप्राचार्य कारभारी वाकचौरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ओहरा ज्यनिअर काँलेज चे प्राचार्य विजय कोडूर, आपले मानवाधिकार फाऊंडेशन अहमदनगर जिल्हा सचिव रेणुका दिघे, जिल्हा अध्यक्ष दर्शन जोशी, संगमनेर तालुका अध्यक्ष श्री. ताजणे , उपाध्यक्ष सौ. नम्रता दिघे, उपाध्यक्ष मेजर विजय सातपुते, तालुका सचिव सौ. स्वाती राऊत, कार्याध्यक्ष बजरंग जेडगुले , कलाध्यापक शैलेश वाव्हळ, पत्रकार दत्तात्रय घोलप , लहु सातपुते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सातपुते यांनी केले
तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक राणे यांनी मानले यावेळी विद्यार्थी , शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.