Breaking News
recent

डॉ. दिपेश पष्टे संचालित आपले मानवाधिकार फाउंडेशनचे कार्य सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी -- आ. डॉ. सुधीर तांबे

 



संगमनेर प्रतिनिधी


    शुक्रवार दि.२० मे २०२२ रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता डॉ. दिपेश पष्टे संचालित व संगमनेरचे भूषण आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत 'आपले मानवधिकार जनता दरबार' व 'पुरस्कार वितरण सोहळा' उत्साहात संपन्न झाला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, तर यात संविधान वाचन देखील करण्यात आले. सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी,अधिकारासाठी लढणारे आपले मानवधिकार फाऊंडेशन होय.जे छत्रपती शिवरायांची शिकवण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित कार्य करत आहे. याची पायाभरणी ही डॉ. दिपेश पष्टे यांनी केली आहे. या फाउंडेशन अंतर्गत नवीन संकल्पना 'आपले मानवाधिकार जनता दरबार' नव्याने सुरू करण्यात आली. त्याचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संगमनेर शहरात करण्यात आले होते.

      या कार्यक्रम प्रसंगी "आपले मानवाधिकार फाउंडेशन समाजासाठी अनेक प्रेरणादायी कार्य करत असून त्यांचे उपक्रम,  राज्यघटना व मानवतेसाठी असलेले अधिकार व कर्तव्य यांचा प्रचार-प्रसार सध्या महाराष्ट्रभर करत आहेत" असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ. दिपेश पष्टे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात फाउंडेशनचे कार्य, उद्देश व उद्दिष्टे उपस्थितांना प्रभावीपणे सांगितले. आपल्या मनोगतात नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांनी आपल्या मनोगतातून समाजात सध्या महिलांसमोर असणाऱ्या समस्या विशद केल्या.

      यावेळी व्यासपीठावर संगमनेर तालुका नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार,परफेक्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिता कोडे,माझे माहेर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुषमा कासारे, आपले मानवधिकार वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल भटकर, स्ट्रॉबेरी शाळेच्या संचालिका संज्योत वैद्य, ज्येष्ठ संपादक किसनराव हासे, साई समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप आरगडे बी.एस.टी. कॉलेजचे प्रा.डॉ.डी.डी पाटील, प्रा.ज्ञानेश्वर गोंटे,पत्रकार दत्तात्रय घोलप,अरुण गोडसे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजात विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांचा यावेळी आपले मानवधिकार फाउंडेशनच्यावतीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.  

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव रेणुका दिघे यांनी आभार प्रदर्शन दर्शन जोशी व सूत्रसंचालन संदीप सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आपले मानवधिकार फाऊंडेशनचे पदाधिकारी स्वाती राऊत,नम्रता दिघे,मेजर विजय सातपुते,बजरंग जेडगुले,विनायक ताजणे,पुनम घुले सामाजिक कार्यकर्ते सुनील दिघे,शैलेश वाव्हळ,भूषण उकिर्डे,संतोष दिघे आदींनी विशेष मेहनत घेतली.



Powered by Blogger.