एमएससीडिएचा निवडणूक प्रचार जोमात सुरू
चिखली - दि.८ मे रोजी बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे पदाधिकारी यांनी पेठ,अमडापूर,उदयनगर,ईसोली, जानेफळ,कळंबेशवर,मंगरूळ नवघरे आदी ठिकाणी स्टेट फार्मसी कौन्सिलच्या निवडणूक प्रचार दौऱ्याचे आयोजन केले होते.संपूर्ण राज्यासह जिल्ह्याभरात निवडणूकीच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधून युवा फार्मासिस्ट गणेश बंगळे अहोरात्र फिरत आहेत,आज ते बुलढाणा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे जिल्हा सचिव गजानन शिंदे व सहसचिव प्रशांत ढोरे पाटील यांच्या सोबत चिखली व मेहकर तालुक्यातील दौऱ्यावर होते,दौर्यादरम्यान ठीक ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले,यावेळी संगटनेचे सचिव गजानन शिंदे यांनी गणेश बंगळे सह एम एस सी डी ए पॅनलच्या इतर उमेदवारांना मत म्हणजे आप्पासाहेब व अनिलभाऊंना मत असे बोलतांना सांगितले, पाटील यांनी
केमिस्ट कोहिनुर अनिलभाऊ नावदंर यांनी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलसाठी जिल्ह्यातील एक सामान्य फार्मासिस्टला सदर निवडणूक लढवण्यास समोर केलं व ती जबाबदारी समर्थपणे सांभाळण्याची तयारी फार्मासिस्ट गणेश बंगळे यांनी दाखवली व त्यांनी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील फार्मासिस्टसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले असून पुढे देखील ते असेच काम करतील असा विश्वास व्यक्त केला,गणेश बंगळे हे एक अत्यन्त मेहनती, होतकरू, शिक्षित व ध्येयवेडा फार्मासिस्ट असून त्यांना व पॅनलच्या इतर उमेदवारांना बुलढाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातुन रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणू असे जिल्हा सह सचिव प्रशांत ढोरे पाटील यांनी जानेफळ येथे झालेल्या सभेत आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले ,एम एस सी डी ए चे अधिकृत उमेदवार गणेश बंगळे यांनी आप्पासाहेबांनी व अनिल भाऊंनी तसेच आपण सर्वांनी टाकलेल्या विश्वासाला कधी ही तडा जाऊ देणार नाही व रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत फार्मासिस्ट ,केमिस्टसाठी कटिबद्ध राहील असे सांगितले, याप्रसंगी सल्लागार समितीचे सदस्य विनोद नागवाणी यांनी देखील विस्तृतपणे संगटनेचे ध्येय धोरण सांगितले,याप्रसंगी चिखली केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील तायडे,उपाध्यक्ष बद्री पानगोळे व जिल्हा प्रतिनिधी सुनील पारस्कर,शाम रोडगे व बहुसंख्य केमिस्ट व फार्मासिस्ट उपस्थित होते.