Breaking News
recent

आगामी निवडणूकीत समविचारी पक्षांकडून प्रस्ताव आल्यास युती होऊ शकते - प्रदिप वानखडे

 


नांदुरा  ( प्रतिनिधी) 

येवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद,महानगरपालिका निवडणुकीत समविचारी पक्षांकडून प्रस्ताव आल्यास युती होऊ शकते असे स्पष्ट संकेत वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा जिल्हा प्रभारी प्रदिप वानखडे यांनी दिले.स्थानिक नालंदा नगर येथे दि.२६ मे ला वंचित बहुजन आघाडीच्या तालुका व शहर कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिले.बुलडाण्याची भूमि पक्षाकरीता अतीशय सुपिक आहे.संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्यानुसार शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी ! ह्या उक्तीनुसार शुद्धाचरणी व प्रामाणिक उमेदवार दिल्यास अकोला जिल्ह्याप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडी गेम चेंजरची भूमिका पार पाडू शकते नव्हे सत्तेत सहभागी होऊ शकते असेही ते पुढे म्हणाले. कार्यक्रमाची सुरूवात प्रथमतः महापुरूषाच्या फोटोला माल्यर्पणाने झाली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून कलम ३४० व ३४१ नुसार एससी, एसटी व ओबीसींना आरक्षण दिले. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकिय आरक्षण संपुष्टात आले आहे. 

   आता ओबीसींना राजकीय आरक्षण बाबासाहेबांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर हेच देवू शकतात असा दृढ विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अॅड अनिल इखारे यांनी ह्यावेळी व्यक्त केला. ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गणेश चौकसे,महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष विशाखा सावंग, रामकृष्ण रजाणे, शरद वसतकार,राजाभाऊ भोजने, भीमराव तायडे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या चार सर्कल प्रमुखपदी अनुक्रमे चांदुरबिस्वा अनिल धुंदळे, वसाडी धर्मेश तायडे, निमगांव अजाबराव गाडे, व वडनेर मो.जमीर यांची निवड करण्यात आली. तर शहराकरीता प्रल्हाद कांबळे, राजेश वानखडे,सलीमोद्दीन अलिमोद्दीन यांची निवड करण्यात आली. 

    तालुका अध्यक्ष अजाबराव वाघोदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या मेळाव्याचे संचलन अॅड.सदानंद ब्राह्मणे यांनी तर प्रास्ताविक भगवान इंगळे यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दिलीप मेढे,कोषाध्यक्ष निरंजन तायडे, भगवान वाकोडे, संजय इंगळे, पि.डी.सरदार, गणेश वानखडे, श्रीकृष्ण इंगळे ,सुमन थाटे ,प्रमिला वाघ यांची विशेष उपस्थिती होती. ह्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश वाघोदे, विलास तीतरे, रमेश ठाकरे, सिद्धार्थ वाघोदे,यशवंत वाकोडे,दशरथ दांडगे,धम्मपाल वाघोदे, अशांत रणित,देवराज वाकोडे, सिद्धार्थ तायडे,उमेश वाघ यांनी परीश्रम घेतले.

Powered by Blogger.