Breaking News
recent

मलकापूर न प निवडणूक प्रभाग रचना मध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून नियमांची पायमल्ली

 



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे


मलकापूर:नगर परिषदेने राज्य निडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेमध्ये निर्देशित सर्व नियमांची पायमल्ली केली असुन राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कुठल्याच नियमांचा वापर न करता प्रभाग रचना अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असल्याबाबतचा आरोप समतेचे निळे वादळ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यानी केला आहे.

          राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रभाग रचना मध्ये निर्देशित नियमामध्ये प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करणे, प्रभाग रचना ही उत्तर दिशेकडून पूर्वेकडे सुरुवात करणे, प्रभाग रचनेमध्ये येत असलेल्या प्रगणन गटाच्या बहुभुजा सीमा मांडणे, प्रभाग रचना मध्ये लाल-निळा-हिरवा रंगाचा वापर करणे, तसेच भौगोलिक सीमा ( नदी, नाले) महामार्ग, लोहमहामार्ग  क्रॉस न करणे असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नियम नमुद केले असताना  या सर्व नियमांना मलकापूर नगर परिषदेने प्रभाग रचना करताना पायमल्ली केली आहे.

          प्रसिध्द गुगल नकाशाचे अवलोकन केले असता या आदेशाचे उल्लंघन केल्याचे व जाणीवपुर्वकरित्या या आदेशांचे पालन न केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे . नकाशावर प्रगणक गटांच्या सिमा हिरव्या रंगाने दर्शविण्यात आलेल्या नाही . प्रगणक गटाचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या नमुद करण्यात आलेली नाही . जनगणना प्रभागांच्या सिमा निळ्या रंगाने दर्शविण्यात आलेल्या -नाहीत . नकाशावर शहरातील महत्वाच्या ठिकाणे , रस्ते , नद्या , नाले , रेल्वे लाईन इत्यादी दर्शविण्यात आलेल्या नाहीत . प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करणे आवश्यक असतांना देखील स्वतंत्र नकाशा तयार केलेला नाही. तसेच प्रभाग तयार करत असताना एक प्रभाग तीन ते साडेतीन किलोमीटरचा करण्यात आला आहे असा आरोप केला आहे.

      या प्रभाग रचनेवर प्रस्थापित राजकीय पक्ष व सत्ताधाऱ्यांनी कुठलीही हरकत घेतली नसुन अशा सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी व सोयीच्या राजकारणासाठी नियमांची पायमल्ली केल्या गेली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेसमोर भाई अशांत वानखेडे यांनी केला आहे. शिवाय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार प्रभाग रचना न झाल्याबाबतची हरकत  जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून त्याची सुनावणी दिनांक करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे तरीसुद्धा प्रभागरचना नियमानुसार न झाल्यास व न्याय न मिळाल्यास या अन्यायकारक प्रभाग रचने विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल अशी भूमिका पत्रकार परिषदेत भाई अशांत वानखेडे यांनी मांडली.

Powered by Blogger.