मलकापूर येथे श्री समर्थ सेवा मंडळ यांचे अनिवासी संस्कार शिबीर
मलकापूर
मुले संस्कारक्षम व्हावीत हे असिधारा व्रत गत 29 वर्षापासून श्री समर्थ सेवा मंडळ मलकापूर यांच्यातर्फे सुरू आहे.गीता अभ्यास वर्ग, गीता पाठांतर स्पर्धा व संस्कार शिबिर इत्यादी उपक्रम संस्थेतर्फे राबविली जातात. मागील दोन वर्षात कोरोनामुळे ऑनलाइन शिबिर घेतले. यावर्षी ऑफलाइन व पालक वर्गाचा आग्रहास्तव ऑनलाइन अशी दोन्ही शिबिरे सुरू आहेत. शिबिरामध्ये सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, विविध संस्कृत स्तोत्रे, बैठे व मैदानी खेळ , आध्यात्मिक बोधकथा इत्यादी माध्यमातून मुलांचे मन , मनगट व मेंदू सुदृढ करण्याचे काम करीत आहेत.
सदर शिबिर हे लीलाधर भोजराज चांडक विद्यालय मलकापूर येथे 25 ते 31 मे या कालावधीत संपन्न होत आहे . यामध्ये दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील सुमारे शंभर मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत या शिबिराची वेळ असून आज सकाळी मुलांची प्रभात फेरी काढली आहे. चांडक विद्यालय- अब्दुल हमीद चौक - निमवाडी चौक - हनुमान चौक - गाडगे बाबा पुतळा या मार्गे ही प्रभात फेरी काढून शहरात एक आगळे चैतन्य निर्मिती यामुळे घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुलांचा शारीरिक, बौद्धिक क्षमतांचा विकास तसेच सामाजिक व राष्ट्रीय जनजागृती असे या शिबिराचे ठळक वैशिष्ट्ये आहेत.
कार्यक्रम यशस्वी करता संगीता हातवळणे ,सुषमा बारस्कर , स्मिता देशपांडे, मनीषा बापट, अर्पणा देशपांडे, अश्विनी काटे, सीमा सावजी , नीता ढापणे, अस्मिता राजपूत, मंजुषा एरंडोलकर, स्वाती धरणगावकर, अंजली देशमुख ,दिव्या जोशी, नीलिमा देशपांडे , स्नेहल देशपांडे, विणा कुलकर्णी, नयना बक्षी , स्मिता धर्माधिकारी , शुभांगी देशपांडे , सुजाता इंगळे, स्वाती पाठक, किरण मेरेकर, वैशाली पिंपरकर ,मनीषा जोशी, प्रतिभा भागवत व भूषण कुलकर्णी इत्यादींनी परिश्रम घेतले.
