Breaking News
recent

नांदुरा येथे महा स्वराज्य अभियान व मिशन वात्सल्य कार्यक्रम



नांदुरा प्रतिनिधी

नांदुरा :- तालुक्यात दि, 30 मे 2022 रोजी 11 : 00 वाजता स्थानिक मंगल पांडव कार्यालय नांदुरा येथे हजर राहण्यात यावे , जिल्हाधिकारी सी.राममूर्ती व आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनात महा राजस्व अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,तसेच प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा च्या वतीने  कोविड -19 मध्ये ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष यांचे निधन झाले असेल त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणार येणार आहे, सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या वतीने नांदुरा अर्बन बँक व इतर बँक कडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत दिली जाणार आहे ,महा स्वराज्य अंतर्गत विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत,त्यामधून पंचायत समितीकडून गोठ्या बाबत व इतर योजनांची माहिती देण्यात येणार आहे, तसेच तालुका कृषी विभाग महिला व बालकल्याण विभाग सहाय्यक निबंधक मुख्याधिकारी नगरपरिषद या विभागाची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे 

     या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश एकडे हे राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा व कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज देशमुख उपविभागीय अधिकारी मलकापूर हे राहणार आहेत प्रमुख अतिथी अभिजीत नाईक महसूल उपजिल्हाधिकारी बुलढाणा, पदम पाटील प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा,वसंतराव भोजने, मोहन पाटील ,भगवान धांडे, आणि प्रमुख उपस्थिती मध्ये राहुल तायडे तहसीलदार नांदुरा, समाधान वाघ गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा, आशिष बोबडे मुख्याधिकारी नगर परिषद नांदुरा, भूषण गावंडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदुरा,अपूर्व अंगाईत तालुका कृषी अधिकारी नांदुरा, शिल्पा खोडके महिला व बालकल्याण विभाग नांदुरा, सांगळे सहाय्यक निबंधक नांदुरा,तरी सर्व नागरिकांनी दि, 30 मे 2022 रोजी 11: 00 वाजता पांडव मंगल कार्यालय नांदुरा येथे उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी त्यांच्या प्रेसनोट द्वारे माहिती देण्यात आली.

Powered by Blogger.