धर्मवीर मॅरेथॉन बुलडाणा २०२२ मोठ्या उत्साहात संपन्न
सागर वानखेडे,(बुलडाणा प्रतिनिधी)
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर आखाडा बुलडाणाच्यावतीने बुलडाणा येथे भव्य खुल्या पुरुष व महिला गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील असंख्य युवक आणि युवतीनी सहभाग घेवुन स्पर्धेची शोभा वाढविली, पार पडलेल्या धर्मवीर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये हरियाणा येथील इंडियन नेव्हीचे जवान श्री. रोहित वर्मा यांनी प्रथम क्रमांक घेऊन 25,000 रुपये, मेडल आणि ट्रॉफीचे मानकरी ठरले, तसेच द्वितीय क्रमांकाचे मानकरी नाशिक येथील श्री. प्रदूमन सिंग हे 20,000 रुपये तसेच मेडल आणि ट्रॉफीचे मानकरी ठरले, तृतीय क्रमांक पुन्हा हरियाणा येथील अंकित देशवाल यांनी पटकावून 15,000 रुपये तसेच मेडल आणि ट्रॉफीचे मानकरी ठरले.
खुला गट महिला मधून प्रथम येण्याचा मान नागपूर येथील प्राजक्ता गोडबोले यांनी पटकावून 20,000 रुपये तसेच मेडल आणि ट्रॉफीच्या मानकरी ठरल्या, द्वितीय क्रमांक बुलडाणा येथील पूनम सोनुने यांनी मिळवून 15,000 रुपये तसेच ट्रॉफी आणि मेडलच्या मानकरी ठरल्या, तसेच तृतीय क्रमांक परभणी येथील अश्विनी जाधव यांनी मिळवुन 10,000 रुपये तसेच मेडल आणि ट्रॉफीच्या मानकरी ठरल्या, ह्या सर्व विजयी स्पर्धकांना धर्मवीर शिवसेना आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस तसेच मेडल आणि ट्रॉफी वितरण करण्यात आले, यावेळी अनेक खेळाडूंना सुद्धा सहभागपर प्रशस्तीपत्र तसेच प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली.
सदर स्पर्धेतील यशस्वीतेसाठी युवानेते कुणाल संजय गायकवाड, बुलडाणा शहरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री काटकर साहेब, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज संजय गायकवाड,माजी आरोग्य सभापती श्री. आशिष जाधव, श्री. गोपालसिंग राजपुत सर, मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्री वानखेडे सर, क्रीडा विभागाचे श्री धारपवार सर,, श्री व्यवहारे, श्री श्रीवास्तव सर, श्री चितळे, सौ. कल्पना माने मॅडम, श्री. रवी धामोडे, श्री. विलास गायकवाड, श्री. समाधान टेकाळे, प्रज्ञा सरकटे, ज्ञानेश्वरी भालके, पूनम सोनुने, गुंजन जतकर, पूनम बंगाळे, वैभव काळवाघे, स्नेहजित तायडे, गजानन नागवे, तेजस कानडजे, आदित्य जाधव, रणजित राठोड, दीपक जाधव,स्वीयसहाय्यक श्री. श्रीकृष्णा शिंदे, श्री. संतोष शिंगणे, श्री अनुप श्रीवास्तव, तसेच असंख्य स्वयंसेवक, तसेच धर्मवीर परिवार आणि बुलडाणा ऍथेलेटीक्स क्लबचे सर्व सदस्य तसेच तेजस्वी स्पोर्टचे खेळाडू उपस्थित होते.