Breaking News
recent

आधारपर्व फाऊंडेशच्या वतीने किराणा किट,कपडे देऊन नितोने परिवारास मदतीचा हात

 


        अकोट तालुक्यातील चण्डिकापुर येथे वयोवृध्द दाम्पत्य आजी आजोबा राहात असून वयामुळे काम करू शकत नसल्यामुळे व कोणचा सहारा नसून शेजारी परीवार सहकार्य करत असतात या विषयाची माहिती किशोर लोखंडे यांच्या माध्यमातून आधारपर्व फाउंडेशनला कळताच आजीबाई कलावती नितोने,आजोबा सेवकराम नितोने परिवाराला एका महिन्याच्या किराणा साडी,चोळी, कपडे देऊन मदतीचा हात  देण्यात आला, मदत देतेवेळी आजीबाईच्या डोळ्यात पाणी आले असता तूम्ही आम्हाला मदतीची साथ दिली तुमचे सेवाकार्य असेच खुप पुढे जात राहो अशीआजीबाईने भावना व्यक्त केली .

   यापुढे हि आधारपर्व टीम त्यांचा मदतीस सोबतच राहणार या सेवाकार्यात आर.के.भैया,श्रद्धा गढे, अमोल बावस्कार, आशिष वायझोडे, वैशाली जाधव,नीता वायकोडे, किशोर लोखंडे, सुनीता ताथोड, सचिन चौबे, रघुनाथ नेवरे, श्रीकांत साबळे, मीनाक्षी झापर्डे, संतोष फाळके, आकाश कवडे,नागसेन धाडसे,अर्जूनसिंग राजपूत यांचे सहकार्य लाभले.ज्या भागात गरीब गरजु ,अपंग,निराधार परीवार आहेत त्यांचा पर्यंत आम्ही पोहचत आहोतच तरी आपल्या भागात ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे .

    त्यांना एकट सोडु नका प्रत्येकाने आपल्या परीने जी मदत होईल ती केली पाहिजे हिच वेळ आहे माणसातला देव माणूस दाखवण्याची असे आधारपर्व फाऊंडेशन अध्यक्षा श्रद्धा गढे यांनी मदत सेवाकर्त्यांना विनंती केली आहे. ज्यांना मदतीच्या सेवाकार्यात मदत करायची आहे संपर्क साधून सहभाग नोंदवावा असे आव्हान मुख्य कार्यकारी अमोल बावस्कार यांनी केले.

Powered by Blogger.