Breaking News
recent

पिक विमा जमा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

 


प्रतिनिधी

  प्रधान मंत्री पिक विमा  सन २०२१-२०२२ मध्ये झालेल्या नुकसानीचा विमा बँक खात्यात जमा  करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी निवेदन दिले असून निवेदनात नमूद केले आहे. चांदूर बिस्वा अंतर्गत सोयाबीन ज्वारी ,कापूस व इतर पिकांवर अतिवृष्टी तसेच पिकावर व्हायरस आल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्याचे शेताला लागणारा खर्च सुद्धा निघालेला नाही त्यामुळे शेतकरी अतिशय संकट ग्रस्त आहे.

ग्राम चांदूर बिस्वा येथील नुकसानीची पाहणी करणे करिता ह्या पूर्वी सुद्धा पथक येथून गेलेत त्यांनी हजर असलेल्या शेतकऱ्याचे शेतीचे फोटो वगैरे काढून नेलेल असून सुद्धा अद्याप ही त्यावर कारवाही केलेली नाही तरी सर्वच शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून पिक विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी यासाठी तालुका कृषी अधिकारी अंबिका फाउंडेशन चे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी निवेदन दिले.तरी मका हे पिक पावसामुळे खराब झाले आहे.सोयाबीन पिकावर रोटर फिरवावे लागले तरी पिक विमा कंपनी अवकाडी पाऊस झालेला नाही असे सांगते त्यामुळे शेतकरी पिक विम्या पासून वंचित आहे.तरी १८/१०/२०२१ शेतकऱ्याच्या ताक्रतीच्या दाखल घेऊन पिकाचे नुकसान झालेल्या निकषाप्रमाणे ग्राह धरून प्रधान मंत्री पिक विमा योजना सन २०२१-२०२२ मध्ये झालेल्या नुकसानीचा विमा बँक खात्यात जमा करण्यात यावा असे निवेदनात दिले आहे.

Powered by Blogger.