राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री जालना,राजेशभैया टोपे साहेब यांना संमेलनाचे निमंत्रण
शिवाजी खंडारे मंठा प्रतिनिधी
जालना- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 28 व 29 मे 2022रोजी मंठा या ठिकाणी सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे, या साहित्य संमेलनास मोठया संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, या संमेलनास राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री जालना , राजेश भैया टोपे साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांना आज साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निमंत्रण दिले या वेळी मुख्य संयोजक तथा महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल खंदारे, औरंगाबाद विभाग अध्यक्ष भरत मानकर, व संजय वाघमारे उपस्थित होते.