पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
मतीन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर
तालुक्यातील बावनबिर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ग्रामपंचायत सरपंच गजानन मनसुटे व ग्रा.पं सदस्या सौ.अर्चनाताई अर्जून गव्हाळे यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व माजी ग्रा.पं.सदस्य योगेश पुंडे, तलाठी विश्वनाथ सुदेवाड, कर्तव्यदक्ष ग्रा.पं.सदस्य शेख रफीक, सोनु वसतकार, दामोदर भगत, ग्रा.पं.सदस्या मिराताई विजय शेगोकार, पत्रकार भास्कर बोंद्रे, संजय इलामे,भास्कर इलामे, देविदास शिंदे, प्रदीप पुंडे, गजानन पुंडे, ग्रामपंचायत लिपिक शैलेश सिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.