यवत ग्रामपंचायत व पोलिस स्टेशन मध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.
दौंड प्रतिनीधी.
दौंड - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती निमित्त आज अभिवादन करण्यात आले. यवत पोलिस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले.यावेळी महिला पोलीस कर्मचारी सोनाली सुर्यवंशी, पोलिस नाईक सुजीत जगताप, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तर यवत ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम व सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी यवत येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक दादा मासाळ सर ,महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करत आपले विचार मांडले तर दीपक मोटे यांनी अहिल्यादेवींचा जीवनपट कार्याची महत्वाची माहिती उपस्थितांना देत अभिवादन केले.यावेळी यवत ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच समीर दोरगे यांनी अहिल्यादेवींना अभिवादन करत उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांचे आभार मानले .
यावेळी ,ग्रामपंचायत सदस्य नाथादेव दोरगे, इमरान तांबोळी, मनोहर खुटवाड,माजी उपसरपंच सोमनाथ करे, समता परिषद कार्याध्यक्ष मंगेश रायकर,सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भालेराव, विलास भालेराव,सोमनाथ रायकर,दौंड तालुका मातंग नवनिर्माण सेना अध्यक्ष काळुराम शेंडगे, नंदकुमार लाटकर, गणेश कोळपे ,लक्ष्मण कोळपे, सोमनाथ कोळपे, सोमनाथ करे, गणेश कोळेकर, मल्हारी बिचकुले ,किसन चोरमले ,कामाजी चोरमले, अमोल वळकुंडे ,सुभाष बिचकुले, राहुल बिचकुले, राजू कोळपे, पोपट लकडे, आनंदा कोळपे ,रामदास चोरमले उपस्थित होते.