आ. संजय गायकवाड यांची मोतांळा तालुक्यातील निपाना येथील सभेसह विविध ठिकाणचे भूमिपूजन संपन्न
सागर वानखेडे प्रतिनिधी
दिनांक 22/5/2022 रोज रविवार ला माननिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचे हस्ते मोताळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न. धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांचा विकास कामाचा झंजावात सुरू असून आज दिनांक 22 मे रोजी 1 कोटी 45 लक्ष रुपये निधी च्या विकास कामाचे भूमिपूजन यांच्या हस्ते पार पडले.माननिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते चिंचखेड येथे 7 लक्ष रुपये निधी असलेल्या सामाजिक सभागृह बांधकाम करणे, पिंपळगांव नाथ येथे व्यायामशाळा बांधकाम करणे निधी रू 7 लक्ष, रामगावं येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे निधी रुपये 7 लक्ष, धामणगाव देशमुख येथे स्मशान भूमी बांधकाम व सौंदरिकरण करणे .
निधी रू.7 लक्ष, बजरंगपुर (कोथळी)येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे निधी रुपये 15 लक्ष, आडविहीर येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे निधी रुपये 10लक्ष, तसेच तालखेड येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे निधी रुपये 10 लक्ष व सामाजिक सभागृह बांधकाम करणे निधी रुपये 5 लक्ष, शेलापुर येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे निधी रुपये 15 लक्ष, टेंभी येथे सभामंडप बांधकाम करणे निधी रुपये 7लक्ष, आणि निपाना येथे नळयोजना- पाइपलाइन चे लोकार्पण करणे निधी रुपये 41 लक्ष 20 हजार व पोच रस्ता बांधकाम करणे निधी रुपये 7लक्ष, तथा रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट ची कामे करणे निधी रुपये 6 लक्ष 80 हजार इत्यादी इत्यादी कामांचा समावेश आहे, दोनच दिवस आधी माननिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांनी बुलडाणा शहराकरिता रस्ते व पाईप लाईनसाठी 101कोटी रूपयांचा भव्य निधी मंजूर करूनआणला आहे.
कोट्यवधी रुपये मंजुर करून आणल्याने माननिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे, याप्रसंगी बोलताना माननिय आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी आपण मोताळा तालुक्यात व मतदारसंघा मध्ये शासनाकडून आणखी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही दिली. माननिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांच्या विकासाचा झंझावात मतदारसंघ सुरू असून कोट्यावधी रुपयाची उद्घाटन व भूमिपूजन समारंभ मतदारसंघात पार पडत आहेत. आपल्या आमदाराची ची कामगिरी खरंच दमदार असल्याची चर्चा मतदारसंघात पाहायला मिळत आहे, तेव्हा माननिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांच्या सोबत शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, पदाधिकारी कार्यकर्ते व संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी, अंगणवाडी सेविका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.