आपली छोटीसी मदत भरत जाधवला देवू शकते दृष्टी!
बुलडाणा- तालुक्यातील कोलवड येथील, भरत जाधव, पत्नी सौ.सिमा जाधव, वृध्द आई आणि दोन गोंडस मुली असा त्यांचा परिवार आहे. छोटा सुखी परिवार आहे. ३६ वर्षीय भरत पेंटरचा धंदा करुन कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. परंतु त्याच्या डोळ्याला जखम झाली अन् त्या जखमेमुळे त्याला आपला डोळा गमविण्याची पाळी आली. यासाठी त्याने बुलडाणा, जालना व औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार केले. परंतु डोळाच बदलवावा लागणार असल्याने हैद्राबाद विंâवा चेन्नई येथे शस्त्रक्रीया करुन डोळा बसवावा लागणार आहे. यासाठी २ ते ३ लाख रुपये खर्च येणार असून तो जाधव कुटुंबींयाना झेपविणारा नाही. जर समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली तर भरतला त्याची दृष्टी परत मिळू शकते.
गरीबांना जीवन जगतांना फार मोठा संघर्ष करावा लागतो. राबराब राबयचे, मुला-मुलींना शिकवायचे, भाकरीचा चंद्र शोधण्यातच दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस केंव्हा होतो हे समजण्यापलीकडचे अनाकलनीय कोडचं अशीच ही एक घटना आहे, कोलवड येथील भरत जाधव यांची, ‘हम दो हमारे दो’ सुखी परिवार भरत पेंटरचे काम करतो तर सिमा शेतातील किंवा मिळेल ते काम करुन कुटुंबाला हातभार लावते. त्या दोघांचा राजाराणीचा संसार होता. पण त्या संसाराला ग्रहण लागले आणी त्यातच भरतच्या डोळयाला जखम झाली पैश्याअभावी वेळेवर उपचार करणे शक्य न झाल्याने जखम वाढल्याने बुलडाणा, औरंगाबाद, जालना येथील डोळयांच्या डॉक्टरांकडे उपचार घेतला परंतु हा उपचार प्राथमिक होता. त्यांना जालना व औरंगाबाद येथील डॉक्टरांनी हैद्राबाद येथे उपचार करुन डोळा बदलविण्याचा सल्ला दिला आहे.
भरत जाधव कर्तापुरुष वडिलांचे छत्र हरपलेले त्यात वृध्द आई, मुली व पत्नीचा उदनिर्वाहाचा प्रश्न असतांना डोळयाने दिसत नसल्याने पेंटरकीचे काम कसे करावे? हा प्रश्न त्यांच्या समोर ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. त्यातच दृष्टी मिळविण्यासाठी चेन्नई किंवा हैद्राबाद येथे डोळयाची शस्त्रक्रीया करुन नविन डोळा बसविणे यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला २ ते ३ लाख रुपयांचा खर्च अठराविश्व दारिद्रयात असलेल्या जाधव कुटुंबीयांना झेपविणारा नाही. जर डोळयांची शस्त्रक्रीया केली तर भरत आपला पेंटरकीचा व्यवसाय करुन कुटुंबीयांचे पालनपोषण व मुलींचे शिक्षण तसेच वृध्द आईची सेवा करु शकतो. आपली छोटीसी मदत कोलवडच्या भरत जाधवला नविन दृष्टी देवू शकते, एवढे मात्र निश्चीत!
समाजातील दानशूर व्यक्ती तसेच समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते राजकीय मान्यवरांनी समाजप्रती आपलेही काही ऋण या उदांन्त दृष्टीकोणातून भरत दिनकर जाधव यांच्या युनियन बँक अकाऊंट नंबर ६२६५०२०१००११३९२ आयएफसीकोड-युबीआयएनओ-५६२६५३ मध्ये १००, २००, ५०० रुपये किंवा आपल्यापरीने शक्य होईल तेवढी मदत रक्कम पाठवून भरत जाधव यांना एक नविन दृष्टी देवू शकता! भरत जाधव मो.नं. ८९५६८०२४०६