आडगावराजा ते बुलडाणा बस पुर्ववत चालु करण्यात यावी
प्रतिनिधि:- अनिल दराडे
सिंदखेडराजा तालुक्यातील ऐतिहासिक गाव आडगाव राजा ते बुलढाणा बस सेवा सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज दि. २८ एप्रिल रोजी आगार प्रमुख बुलढाणा यांना देण्यात आले. राज्यात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे व अलीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागातील बस सेवा बंद आहे. परिणामी बंद असलेल्या बस सेवेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.बंद असलेल्या बस सेवेमुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे.या खाजगी वाहनांमध्ये जेष्ठ नागरिक व महिला व लहान मुलांचे आतोनात हाल होत असुन बंद असलेल्या बस चा फायदा घेऊन खाजगी वाहन धारक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेत आहेत.
त्यामुळे पूर्ववत बस सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे सिंदखेड राजा तालुक्यातील ऐतिहासिक गाव आडगाव राजा येथून बुलढाणा बस सेवा सुरू होती परंतु कोरोना महामारी व एसटी कर्मचारी संपामुळे सदरील बस बंद करण्यात आली होती. तालुक्यातील व आडगाव राजा परिसरातील नागरिक कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच बुलढाणा येथे येत जात असतात या अगोदर आडगाव ते बुलढाणा बस सेवा सुरू करण्यात आली होती त्यामुळे तालुक्यातील असंख्य नागरिकांचा फायदा होत होता परंतु सद्यस्थितीत सदरील बस बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नागरिकांची ही समस्या लक्षात घेता पूर्वी चालू असलेली आडगाव राजे ते बुलढाणा बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी निवेदन देण्यासाठी डॉ.महेंद्र पवार,सामाजिक कार्यकर्ते अतिश राजे जाधव, पवन राजे जाधव,अंकुश चव्हाण, अजय राजे जाधव,भागवत राजे जाधव आदी मंडळी उपस्थित होती