Breaking News
recent

आमदार राजेश भाऊ एकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व पक्षप्रवेश देऊन सत्कार कार्यक्रम संपन्न

 


प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी

        माननीय बाळकृष्ण पाटील यांनी उत्कृष्ट शेती केल्याबद्दल राज्याचे राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना शेतकरी पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल आमदार श्री.राजेश भाऊ एकडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. संजय गांधी निराधार समितीवर श्री.केशवभाऊ मापारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व त्यांचे पदाधिकारी यांचा आमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना मार्गदर्शन करत असताना गोरगरीब माणसाने काम करावे, असे आमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांनी सुचविले. तसेच भारतीय कांग्रेस पार्टी मध्ये माणिक इंगळे तिकोडी सरपंच, बाळू इंगळे, माजी सरपंच तिकोडी, गणेश वाकोडे, शाळा समिती अध्यक्ष, भास्कर वाकोडे, वासुदेव इंगळे, ग्रामपंचायत सदस्य खैरा यांचा जाहीर प्रवेश झाला.

    पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत आमदार श्री.राजेश भाऊ एकडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संदीप देशमुख,पुंजाजी धोटे, प्रशांत पाटील, भास्कर वाकोडे व सुभान खान वासाडी यांचा किसान सेल व मागासवर्गीय, अल्पसंख्याक व किसान काँग्रेस सेलचे नियुक्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मा. विजय सिंग राजपूत,भानुदास शिंगोटे सर, पदमराव पाटील, विश्वासराव पाटील, प्रशांत देशमुख, हाजी गफ्फार च्याच्या, आशाताई गोंड, निलेश भाऊ पाऊलझगळे, भगवान भाऊ धांडे, सुनीता ताई देशमुख, होनाळे ताई, बोर्डे ताई, पुरुषोत्तम झाल्टे,आकाश वतपाळ, अर्जुन ब्राह्मणे, शंकर बोदडे, सुभान खान, अतुल पाटील, , नारायण झाल्टे, भगवंत वाकोडे, सुशील वाकोडे, भीमराव वाकोडे, शत्रुघ्न तायडे, बंटी वनारे, वाल्मिक भाऊ मुकुंद, सुनील तांगडे, संतोष लाहुडकर, सुपडा भगत,  विजय गवई, सुनील डांबरे, मिलिंद मोरे, गणेश पाटील, पुंडलिक वराडे, भानुदास तीतरे, अनिल घनोकार, महादेव काटे, विजय ढोले, कैलास नामगे, गणेश मोरे, सुभाष पाटील, राजू वानखडे, कैलास भाऊ वानखडे, शरद मुकुंद, विष्णू क्षीरसागर, दत्ताभाऊ गोंड, संतोष वनारे, सदाशिव वनारे, संदीप बोचरे, बंडूभाऊ शिंगोटे, ऋषिकेश देशमुख, पुरुषोत्तम भगत, संजय आढाव, इसाक बेग, शाकिर भाई, राजू चांभारे, प्रकाश ठोंबरे, गजानन पाटील, सुनील वेरुळकर, शालीग्राम तांगडे, शशिकांत गव्हाड व अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यक्रमात हजर होते.

प्रस्तावना - भगवान भाऊ धांडे, सूत्रसंचालन - जयसेन सरदार, आभार प्रदर्शन - केशवभाऊ मापारी यांनी केले व यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Powered by Blogger.