Breaking News
recent

पाणीपुरवठा योजनेतील कामाच्या विलंबाबाबत ग्रामपंचायतीने दिले निवेदन


प्रतिनिधि:- अनिल दराडे

    सिंदखेडराजा:- येथून जवळच असलेल्या सोनोशी ग्रामपंचायत कार्यालयाने पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या गुणवत्ता व कामास होणाऱ्या विलंबाबाबत ग्रामीण पाणीपुरवठा उपभियंत्यास निवेदन सादर केले असून या योजनेअंतर्गत असणारे अधिकारी व ठेकेदार मनमानी कारभार करीत असल्याची तक्रारही केली आहे.सदर निवेदनात मौजे सोनोशी येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे काम संबंधित ठेकेदाराने ऑगस्ट २०१८ मध्ये घेतले होते.सदर कामाची मुदत ऑगस्ट २०२१ मध्ये संपलेली आहे परंतू अद्यापही ही योजना पूर्णत्वास गेली नसल्याने सदर कामास विलंब होत असून यामुळे ग्रामस्थ पाण्यावाचून वंचित राहत असून अद्यापपर्यंत जे काही काम झालेले आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून अधीकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कामास उशीर होत आहे.

    सदरील कामाची मुदत २२ ऑगस्ट २०२१  पासून ३० महिन्यांची आहे.त्याचबरोबर सदरील कामाच्या अंतर्गत वितरण व्यवस्थेचे पाईप जास्त खोल न खोदता काही ठिकाणी फक्त १ फूट खोदलेले आहे.त्यामुळे सदरील पाईपलाईन  भविष्यामध्ये त्रासदायक ठरू शकते तसेच वितरण व्यवस्थेची मुख्य पाईपलाईन व वितरणाची लाईन असे तिनही पाईप एकाच चारीमध्ये टाकले आहेत.याचा त्रास भविष्यात ग्रामपंचायतीला होऊ शकतो. सदरील काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने गावातील सिमेंट रस्ता तोडला परंतु तो सिमेंट रस्ता पुन्हा तयार करून देण्यास ठेकेदार टाळाटाळ करीत आहे.

    या योजनेच्या अंतर्गत धानोरा येथे बांधलेल्या पुलास तडे गेले असून त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे तसेच वितरण व्यवस्थेच्या काही पाईपलाईन डांबरी रस्त्याच्या कडेला व रस्त्यामध्ये टाकून दिले असल्याने रस्ता रुंदीकरणाच्या वेळेस पाईपचे नासधूस होण्याची शक्यता आहे.या कामामध्ये सदरील अधिकारी व ठेकेदार कामास विलंब करून कामाचे दर परत वाढवून देण्याच्या तयारीत आहे.पाण्याची टाकी व शुद्धीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.आदी मुद्दे व तक्रारी सदर निवेदनात नमूद करण्यात आले असून सदर कामाची सखोलपणे चौकशी करण्यात येऊन सांबंधित अधिकारी व ठेकेदारावर योग्य ती कारवाई करन्यात येऊन काम लवकरात - लवकर चांगल्या दर्जाचे करण्यात यावे असे निवेदन सोनोशी ग्रामपंचतच्या वतीने करण्यात आले आहे.



Powered by Blogger.