आंतरराष्ट्रीय चॉपेयन स्पर्धेत धिरजसिंह राजपूत अव्वल
मलकापूर
घिर्णी येथील धिरजसिह नवलसिंह राजपूत याने एप्रिल २०२२ मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल चँपियन पोखरा नेपाल येथे १५०० कि. मी धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदक प्राप्त करून अव्वल होण्याचा बहूमान मिळविला. धिरजसिंह हा सध्या मलकापूर येथील जनता कला महाविद्यालयात बी कॉम व्दितीय वर्षाला आहे.
धिरजसिंह याने देशाकडून खेळतांना सुवर्णपदक पटकाविले असून घिर्णी व मलकापूर नगरीच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे. धिरजसिह हा आपल्या यशाचे श्रेय गुरुजन, आई - वडील, भाऊ व मित्रांना देत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. विशेष म्हणजे अगोदर गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटविला आहे.