Breaking News
recent

बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांना मातृशोक



सागर वानखेडे 

         बुलडाणा अर्बनचे चीफ मॅनेजींग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांच्या मातोश्री सरोजदेवी ब्रीजमोहन झंवर यांचे आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास निधन झाले. मागील अनेक महिन्यांपासून त्या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय अंदाजे 68 वर्षे होते. नागपूर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. तब्येतीमध्ये बरेच चढ-उतार झाले. दरम्यान डॉ. सुकेश झंवर आणि सौ. कोमलताई झंवर दोन्हीही मागील बर्‍याच दिवसांपासून त्यांच्या सेवेमध्ये होते. 

    मातोश्री सरोजदेवी यांची काळजी घेण्याचे काम या दोघांनीही आणि झंवर परिवाराने अहोरात्र केले. मध्यंतरी सरोजदेवी यांनी उपचाराला प्रतिसाद दिला. आता त्या बर्‍या होणार, असे वाटत असतांनाच पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. आज त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले. स्व. सरोजदेवी यांच्या पार्थीवावर उद्या, रविवार सकाळी १० वाजता नागपूर येथे अंबाझरी घाटवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती ब्रिजमोहन तथा मुले मनीष, डॉ. सुकेश आणि उमेश असे तीन पुत्र तथा नातवंडानी भरलेला परिवार आहे. सरोजदेवी यांच्या निधनाने यांचे चांडक आणि झंवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


Powered by Blogger.