आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघाची घोषणा
मलकापूर
दि. १४ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ अंतर्गत व बुलढाणा जिल्हा हौशी आट्यापाट्या असोसिएशन शेगाव जिल्हा बुलढाणा व स्पोट्र्स झोन ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ३५ वी पुरुष ३१वी महिला सिनिअर आट्यपाट्या अजिक्यपद स्पर्धा पुरुष व महिला राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन स्व गजानन दादा मार्केट यार्ड शेगाव येथे दि १८ ते २० मे दरम्यान शेगाव येथे आयोजीत केलेले आहेत.सदर स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडला जाणार असून हा संघ पाँडेचरी येथे दि ६ ते ८ जून डरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्हा संघाची निवड चाचणीचे आयोजन केले होते. स्पर्धेतून खेळाडु खालीलप्रमाणे असून हेच खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धे त बुलढाणा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार असून निवड चाचणीतून खेळाडूची निवड केली गेली असून जिल्हा संघाची घोषणा असोचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे व उपाध्यक्ष अमर खराटे यांनी नुकतीच जाहीर केली.
पुरुष संघप्रदीप डकोरकार (कर्णधार) अनिकेत टाकसाळ, वैभवराज देशमुख विवेक जाधव, देवानंद ढगे मयूर ढगे, गौरव मानकररणजित वाफे अभि वानखेडे अनिकेत वनारे, धीरज नांदोकरदीपक सातव, प्रशिक्षक गजानन पैकेट, व्यवस्थापक विजय पळसकर, महिला संघ, कल्यानी पवार (कर्णधार) अनिशा हुनडे सुस्ती होले वनश्री राजपूत, विनिता खेडद, वैशाली बगाडे किरण मंडरकर क्षितिजा भाबरे श्रद्धा तायडे पल्लवी पाटील अंकिता तायडे पूनम महाजन प्रशिक्षक मयुर गवात्रे व्यवस्थापक प्रसाद सातव. यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंची जिल्हा संघात निवड करण्यात आली.