बंद पडलेले काम सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी
![]() |
वाहनधारकांसाठी जिवघेणा ठरतोय धामणगांव बढेचा मुख्य रस्ता |
सागर वानखेडे :- (मोताळा/बुलडाणा)
विदर्भ व खान्देश सीमेवर वसलेल्या मोताळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या तालुक्यातील धामणगाव बढे येथील मुख्य रस्ता व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. रस्ता व्हावा व उत्कृष्ट व्हावा सांडपाण्याची व्यवस्था व्हावी, रस्त्याच्या मधोमध दुभाजक होवून सौंदर्यीकरण व्हावे अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षा पुर्तिसाठी व नागरिकांना न्याय मिळावा म्हणून, या रस्त्याची दखल विविध प्रसार माध्यमांनी घेतली त्यामुळे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाला जाग येवून हा रस्ता मंजूर होवून रस्त्याचे कामास प्रारंभ झाला आहे.परंतु सदर रस्त्याचे काम जवळपास दोन चार दिवस सुरु राहिले आणि नंतर हे काम बंद पडल्याचे चित्र आहे. आजघडीला हा रस्ता वाहनधारकांसाठी जिवघेणा ठरतो आहे.
सदर रस्ता हा ज्ञानेश्वर गँरेज हिरो होंडा शो रुम ते पाण्याची टाकी पर्यंत खोदून ठेवला आहे.मात्र ह्या रस्त्याचे काम रखडले आहे.जवळपास एक महीण्याच्या वर झाले असुन अद्यापही ह्या रस्त्याचे काम बंदच आहे.खोदलेल्या रस्त्यावर गिट्टि मिक्स बारीक चुरी टाकल्याने हा रस्ता रहदारीस खुप त्रासदायक ठरत आहे.बाजूला पडलेल्या गिट्टिच्या ढिगा चा अंदाज वाहनचालकांना न आल्यास अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.विशेष करून रात्रीच्या वेळेस हा रस्ता धोकादायक ठरु शकतो.सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत होणार असुन सदर रस्त्यावरील डांबरीकरणाचे खोदकाम करून ठेवले आहे.मात्र सध्या हे काम बंद अवस्थेत असुन अपुर्ण कामामुळे वाहतुकीला अळथळा ठरत आहे.
एस.टि. बस लावण्यासाठी जागा सुद्धा राहत नाही, परिणामी वाहण चालकाला आपले वाहण रस्त्याच्या मधोमधच उभे करावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत आहे. सदर जाम लागत असल्याकारणाने अनेक वाद विवादाच्या तक्रारी समोर येत आहे.एवढेच नव्हे तर गाडीच्या चाका खाली येणारी गिट्टि ही वाहणाच्या चाकाखालुन निसटून अती वेगाने उडत आहे.परीणामी रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या व्यवसायीकांना आपला जिव मुठीत धरुन बसावे लागते.थोबाड व डोके केव्हा फुटेल काही सांगता येत नाही. तसेच या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या मोटार सायकली स्लिप होत असुन आता पर्यंत दहा ते बारा दुचाकी वाहन स्लिप झाल्याचे ऐकण्यास मिळत आहे. दुचाकी स्लिप होऊन अनेक ज़न जखमी झाल्याचेही घटना घडल्या असल्याचे बोलल्या जात आहे.अनेकांना अपंगत्व स्विकारावे लागु शकते तर ह्याला जबाबदार कोण? या रस्त्यावर खडी टाकून जनतेच्या जिवाशी खेळ सुरू आहे.तरी या रस्त्यावर वरिष्ठ अधिकारी यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावेे, अशी मागणी जोर धरत आहे.
