विशाखा सावंग रमाई गौरव पुरस्काराने सन्मानित
रमाई प्रकाशन तथा रमाई फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने२७ मे रमाई स्मृती दिनानिमित्त नुकतेच नववे रमाई चळवळीचे साहित्य संमेलन जैन भवन वाशिम येथे संपन्न झाले.याच संमेलनामध्ये विशाखा अरुण सावंग जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी खामगाव यांच्या सामाजिक धार्मिक व राजकीय चळवळीची दखल घेऊन त्यांना रमाई गौरव पुरस्काराने २०२२सन्मानित करण्यात आले.गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळी मध्ये हिरीरीने सहभाग घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
त्यामुळेच विशाखा सावंग यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल रमाई फाऊंडेशनने त्यांना सन्मानित केले आहे.सदर संमेलनामध्ये उषा अंभोरे प्रसिद्ध कवयित्री मुंबई ,किशोर ढमाले विद्रोही साहित्य चळवळ पुणे, माया दामोदर साहित्यिक, या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक डॉ रेखा मेश्राम अध्यक्ष रमाई फाउंडेशन औरंगाबाद, प्रा भारत शिरसाट औरंगाबाद, वंचित बहुजन आघाडी च्या राज्य सदस्य किरण ताई गिरे,प्रा भास्कर पाटील अकोला यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला. रमाई पुरस्कार मिळाल्यामुळे विशाखा ताई सावंग यांचे सर्व स्तरातून भरभरून अभिनंदन , कौतुक केले जात आहे.
