Breaking News
recent

भिमनगर मलकापूर येथील त्रीरत्न बुध्दविहारात बुध्दजयंती साजरी



मलकापूर

    मलकापूर भिमनगर येथील त्रीरत्न बुध्दविहारात बुद्धजयंतीच्या निमित्ताने समाजभूषण श्री आत्माराम इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६ वा."समतेचे निळे वादळ" या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांच्या हस्ते पुष्प,धूप व दिप पूजा करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. बोधाचार्य अशोक सरदार यांनी उपस्थितांना त्रीसरण व पंचशिल प्रदान केले. यानंतर बौद्ध उपासक,उपासिकांनी बुध्द-धम्म गीत गायणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न केला.

    बुध्दजयंतीच्या निमित्त महिलांनी आकर्षक रांगोळी काढून त्रीरत्न बुध्दविहाच्या परिसराचे सौंदर्य खुलविले.रात्री संपूर्ण पूजा विधीसह उपासक व उपासिकांनी मिळून रतनसुत्ताचे सामुदायिक पठण केले.तदनंतर अशांतभाई वानखेडे यांनी बुध्द-धम्मास अनुसरून सविस्तर मार्गदर्शन केले.शेवटी खीरदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी भिमनगर येथील उपासक उपासिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उपस्थिती दिल्याने वातावरण धम्ममय झाले होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अशोक सरदार यानी तर आभार प्रदर्शन सौ.कौशाल भिडे यांनी केले.



Powered by Blogger.