शेतरस्त्याच्या वादातून भावानेच केली भावाची हत्या
श्रीकांत हिवाळे नांदुरा/प्रतिनिधी
तालुक्यातील ग्राम वडाळी येथे शेतरस्त्याच्या जुन्या वादातून ७नातेवाईकांनीच ६५ वर्षाच्या नातेवाईकाला कुऱ्हाड,लाकडी दांड्यांनी जबर मारहाण करून जीवे मारुन टाकल्याची खळबळजनक घटना २५मे च्या सकाळी ९वाजेदरम्यान वडाळी शिवारातील गट क्रं २७८मधील शेतात घडली
याप्रकरणी मृतकाचा मुलगा सागर रवींद्र सरदार वय ३२वर्षे याने नांदुरा पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे वडील मयत रविंद्र सुखदेव सरदार वय ६५वर्षे व आरोपी हे नातेवाईक असून त्यांच्यात शेतीच्या रस्त्यावरुन जूना वाद सुरु आहे या अगोदर घरासमोरील नळावरुन पाणी भरण्याबाबत माझे वडील व आरोपीमध्ये वाद झाला होता मात्र तो वाद मी मध्यस्थी करून मिटवला
मात्र २५मे च्या सकाळी ९वाजेदरम्यान गौतम सुखदेव सरदार, आकाश गौतम सरदार,सौ अनिता गौतम सरदार तिन्ही रा वडाळी तर प्रकाश दशरथ वानखडे,विकास प्रकाश वानखडे,सौ रेखा प्रकाश वानखडे तिघेही रा तरवाडी ता नांदुरा तसेच मनकर्णाबाई ज्ञानेश्वर जवंजाळ रा शिवणी खदान जि अकोला या सर्व आरोपींनी शेतरस्त्याच्या जून्या वादातून वडाळी शिवारातील गट क्रं २७८मधील शेतात गैरकायद्याची मंडळी जमवून कुऱ्हाड,चाकू,लाकडी दांड्यांनी मृतक रवींद्र सरदार यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केला गुन्ह्याची वार्ता कळताच नांदुरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हयातील तिन्ही महिला आरोपींना ताब्यात घेतले तर वृत्त लिहेपर्यंत पुरुष आरोपी फरार असून नांदुरा पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे
याप्रकरणी उपरोक्त सातही आरोपींविरोधात पोलीसांनी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०२,१४३,१४६,१४७,१४८,१४९ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी ( मलकापूर)अभिनव त्यागी, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी भेट दिली
या हत्या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर उमाळे हे करीत आहेत.