जुनी पेन्शन साठी 9 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन संपन्न .
प्रमोद हिवराळे प्रतिनिधी
पंचायत समिती नांदुरा ग्रामसेवक संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांचे वतीने जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यासाठी शासनाचे लक्षवेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती समोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्यानुसार नांदुरा पंचायत समिती मध्ये तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सर्व सभासद पंचायत समितीचे सर्व कर्मचारी यांनी आज कार्यालयीन वेळेत अकरा ते एक बारा या वेळेत तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी अनेक विविध घोषणा देण्यात आल्या तसेच वेळप्रसंगी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी बेमुदत संपाची तयारी असल्याचे सर्व कर्मचारी यांनी एकजुटीने निर्धार केला यावेळी प्रदीप शिंदे तालुकाध्यक्ष राहुल मग तालुका सचिव तथा सर्व ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते सदर आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष श्री प्रशांत जामोदे यांनी केले जुनी पेन्शन चा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला