सोनाळा येथील सौ रजनीताई वेरूळकार यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लखपती दीदी पुरस्कार
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील,केंद्रीय मंत्री मा.प्रतापराव जाधव जलगाव मतदार संघाचे आमदार संजय भाऊ कुटे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोनाळा येथील सौ रजनीताई वेरूळकार यांना लखपती दीदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून रजनीताई वेरुळकर ह्या सोनाळा येथे बचत गटाचे काम करत असतात. बचत गटाचे काम करत असताना त्यांनी अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. स्वतःचा साडी सेंटरचा व्यवसाय करून उमेद अभियानातून कर्ज घेऊन पेटिकोट बनविण्याचे स्वतःचे प्रोडक्शन त्यांनी सुरू केले. या माध्यमातून महिलांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून त्यांची जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शासनाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार केवळ माझा नसून माझ्या सोबत काम करणाऱ्या असंख्य महिलांचा हा सत्कार आहे या सत्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे असे मी मानते सुरू केलेल्या या व्यवसायात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून त्यांचा उत्साह वाढत आहे शेकडो महिलांना मिळत असलेला रोजगार हा हजारोंच्या संख्येत कसा वाढेल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे सौ रजनीताई वेरूळकर यांनी बोलताना सांगितले.