पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.भारती महेंद्र बांगर यांची अविरोध निवड
सागर झनके
जळगाव जा: तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या पिंपळगाव काळे ग्रामपंचायत कार्यालयात 26 मे रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये सौ भारती महेंद्र बांगर यांची सर्वानुमते अविरतपणे निवड करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये पुन्हा एकदा महिला राज प्रस्थापित झाले आहे.सध्या पिंपळगाव काळे च्या सरपंच पदी महिलाच असून उपसरपंच पदाचा मान सुद्धा पुन्हा एकदा महिलेलाचा मिळाला आहे.जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव काळे च्या ग्रामपंचायतीकडे पहिला जाते.ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे.काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांनी गावपातळीवर युतीचा निर्णय घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून बहुमत प्राप्त केले आहे. या अगोदर उपसरपंच पदी असलेल्या सौ. यशोदा घटे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता ,त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर 26 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
गावपातळीवर राजकारण न करता विकासाच्या दृष्टीने सदर निवडणूक यशस्वीपणे पार पडली आणि वंचीत बहुजन आघाडिच्या सौ.भारती महेंद्र बांगर यांची एक मताने उपसरपंच पदी निवड करण्यात आली.गावाचा विकास आणि ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसंरपंच सौ.भारती बांगर यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक ढगे साहेब व ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.आशाताई कळसकार सदस्य सौ.भारतीताई बांगर ,यशोदाताई घटे,उषाताई चोखंडे, वंदनाताई निकम,प्रितीताई तायडे,दुर्गाताई मांडोकार,राधीकाताई राऊत, अर्चनाताई हरमकार, अजय ताठे, सचिन जाधव, नवलसिंग मावळे, शे हारुण अत्तार, नवल गोतरकर, अशोक ढोले, विनोद बहादरे, विलास मांडोकार, सर्वच सदस्य हजर होते. यावेळी ग्राम पातळीवर विकासाच्या दृष्टीने राजकारणाला दूर ठेवून उपसरपदाची माळ वंचीत बहूजन आघाडिच्या सौ.भारती बांगर यांच्या गळ्यात टाकली.त्यासाठी उपाध्यक्ष श्रीकृष्ण गवई,विनोद गवई,सर्कल प्रमुख हरिदास वाघमारे,ग्रामशाखा अध्यक्ष सुधाकर घटे, किशोर वाकोडे यांचे विशेष सहकार्य लाभले
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाष पाटील,वंचीतचे तालुका अध्यक्ष संतोष गवई यांनी सहकार्य केले.यावेळी सुपडा पाटील.युनूस अन्सार, सुनील कळसकार,बाळू निकम, गोपाल तायडे, महेंद्र बांगर,महादेव घुटे,सचिन अरुण अवचार,अमोल बांगर,ठाकूर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुपडा बांगर उमेश मांडकार हजर होते.
