बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करा अन्यथा मनसे करणार आंदोलन
स्थानिक पंचायत समिती कार्यालय नांदुरा येथे तालुका अधिकारी नांदुरा यांना शहर व तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करणेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा शहर व तालुकयांच्या वतीने निवेदन देण्यात आले की उपरोक्त संदर्भित विषयान्वये आपणास नम्रपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की आपल्या शहर व तालुक्यात प्रथमोपचारा पुरत्याच आरोग्य सेवा मिळतात ही वस्तुस्थिती आहे नागरिकांना अधिकच्या उपचाराकरीता खामगाव, अकोला जळगाव (खान्देश)या शहरांकडे धाव घ्यावी लागते ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्यांना या शहरातील मोठ्या खाजगी रुग्णालयातील खर्चिक उपचार परवडतात मात्र आपल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात श्रमिक, कष्टकरी, मजूर यांच्यासह दोन वेळच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत असलेले गोरगरीब नागरिक राहतात ते बिमार पडल्यावर त्यांच्या उपचाराची सर्वस्वी जबाबदारी शासनाची मात्र सरकारी दवाखाने,आरोग्य उपकेंद्रे यांची सद्यस्थितीत काय अवस्था झाली आहे हे सांगण्यासाठी कोण्या होरारत्नाची गरज नाही.
सरकारी आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला असतांना व या निरक्षर गोरगरीब रुग्णांच्या असहायतेचा गैरफायदा समाजातील काही विकृत वैद्यकीय शिक्षणातील कोणतीही पदवी प्राप्त किंवा कोर्स केलेला नसतांना सुद्धा जुजबी उपचार करून त्यांचे आर्थिक ही तरी आरोग्य प्रशासनाने या झोलाछाप डॉक्टरांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१नुसार कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईलने त्या बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करण्यात येईल तसेच पुढील निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला संबंधित प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले , शहर अध्यक्ष सागर जगदाळे , अजय बेलोकार ,राजू काळे,ज्ञानेश्वर कांडेलकर, योगेश सपकाळ , विशाल बघण,निकेतन वाघमारे ,गणेश जाधव धनंजय देशमुख अंकित अवचार सचिन उगले सौरभ इंगळे प्रल्हाद गोंड महादेव खोड आदी मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थित देण्यात आले
