Breaking News
recent

बावनबिर येथे ईद सणाच्या दिवशीच दोन गटात तुफान हाणामारी, एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू



मतीन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर 

    तालुक्यातील बावनबिर येथील ईद सणाच्या दिवशीच बावनबिर - टुनकी रोडवरील पुला जवळ जुन्या वादातून एकच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली असून त्यात जखमी ऐका २७ वर्षीय युवाकाचा मृत्यू झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, बावनबिर येथील मुस्लिम बांधव पवित्र रमाजन ईदनिमित्त नमाज पठण करण्याकरिता सकाळी ७:३० वा. इदगाहवर जात असताना मुस्लिम समाजातीलच सैय्यद व कसार (शेख) या दोन गटात इदगाहवर पोहोचण्यापूर्वीच बावनबिर - टुनकी रोडवरील जुन्या वादातून हाणामारी झाली असून हाणामारीत कसार या गटातील २७ वर्षीय शेख रफीक शेख गणी (रा.बावनबिर ता.संग्रामपुर) या युवाकाचे पोटात सैय्यद गटातील मुख्य अरोपी याने चाकू खुपसल्याने युवक गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉकटरांनी त्याला मृत्यू घोषित केले.

मृतकाचे वडील शेख गनी शेख दस्तगीर (वय ६२ रा.बावनबिर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनाळा पोलीस‍ांनी विविध कलमांन्वये मुख्य आरोपी सह १० जणांवर गुन्हा दाखल करुन आतापर्यंत ३ आरोपींना अटक केले आहे. मृतकावर बावनबिर येथील रात्री ८:०० वा. कडक पोलीस बंदोबस्ताखाली व नायब तहसीलदार, ठाणेदार, जेष्ठ समाजीक नेते, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटीलपती, तंटामुक्ती अध्यक्ष, हजारो मुस्लिम बांधव यांचे उपस्थितीत अंत्यसंस्कार शांतताने पार पडले.बावनबीर येथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार श्रीधर गुट्टे यांचे नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पुढील तपास सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहेत.



Powered by Blogger.