माळी समाज मलकापूर शहर कार्यकारिणी जाहीर
मलकापूर
मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे माळी महासंघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मलकापूर शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
माळी महासंघाच्या वतीने महासंपर्क अभियान सुरू करण्यात आले असून हे अभियान २९ मे रोजी घिर्णी येथे घेण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशदादा ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी समाजभूषण रामकृष्ण चोपडे हे होते. सर्वप्रथम महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महासंपर्क अभियानास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील विविध समस्या, अडचणी बाबत मार्गदर्शन केले. यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशदादा ठाकरे यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष गोपाळराव तायडे यांनी मलकापूर शहर कार्यकारिणीची निवड करीत घोषणा केली. यामध्ये मलकापूर शहर अध्यक्ष पदी श्रीकृष्ण तायडे, शहर युवक अध्यक्षपदी किशोर राऊत, सचिवपदी मंगेश सातव, उपाध्यक्ष संदीप चोपडे, निरज येवतकर, सुपेश बोंबटकार यांची निवड करण्यात आली. यावेळी गजेंद्र बोंबटकार सर, संतोष बोंबटकार, श्याम वानखडे सर, प्रा. डॉ.नितीन भुजबळ, वसंतराव बगाडे सर सरपंच घिर्णी, भगवानभाऊ चोपडे, मनोज बगाडे, पांडूरंग बोपले, मनिष महाराज राऊत यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.