आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा प्रशिक्षण बैठक संपन्न.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या संघटनेची दि १५ मे रोजी शुभ प्रभात डेरी मोताळा येथे प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला 26/27 मार्च ला केंद्रीय बैठक गुजरात येथे तर विदर्भ प्रांत बैठक 19 /20 एप्रिल ला झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा प्रशिक्षण बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये संघटनेचे आगामी कार्यक्रम तसेच उपक्रम बद्दल माहिती दिली चलो कश्मीर चा नारा देत शिरभवानी यात्रा, एक मुठी अनाज, महिला सुरक्षा, इंडिया हेल्पलाइन, त्रिशूल दीक्षा, व अन्य विषयाची माहिती देण्यात आली ही बैठक अहिप चे महाराष्ट्र महामंत्री किशोरजि दिकोंडवार,RBD चे विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुपजी जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बजरंग दल चे जिल्हाध्यक्ष जीवनसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. त्यावेळी मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, बुलढाणा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ता उपस्थित होते.