उड्डाणपुलाच्या ज्वलंत प्रश्नावर किसान सभा मैदानात
नांदुरा
नांदुरा दिनांक 14 मार्च 2022 ला उपविभागीय अधिकारी जळगांव (जामोद)ह्यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री ह्यांना नांदुरा रेल्वे फाटक बंद करून उड्डाणपुलाचे काम सुरू करा असे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोणत्याच प्रकारात अखिल भारतीय किसान सभा ह्यांच्या पदाधिकारी ह्यांच्या सोबत पत्रव्यवहार केला नसल्याने कॉम्रेड विजय पोहनकर ह्यांच्या नेतृत्वाखाली 5 मे 2022 पासून नांदुरा रेल्वे फटका जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे.ह्या आंदोलनात किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड जितेंद्र चोपडे,सरचिटणीस कॉम्रेड अनिल गायकवाड,कॉम्रेड शेख अकबर,बदासींग अहिऱ्या,किसन भैड्या,संतोष पाटील,शेख अताउल्ला,सागर पहुरकर, महादेव भामदरे,शेख मेहबूब इत्यादी मंडळी आंदोलनात सहभागी झाली आहे.ह्या रेल्वे फटका मुळे अनेक रुग्ण दगावलीत, शेतकरी लोकांना अनेकदा माल वाहतूक करतांना संकटे तयार होतात, शैक्षणिक नुकसान ह्याच फटकामुळे विद्यार्थी वर्गाचे झाले आहे.
नांदुरा-जळगांव (जामोद) तालुक्यातील लोकांना हे रेल्वे गेट म्हणजे महासंकट झाले आहे,प्रशासनात काम करणारे अधिकारी-कर्मचारी ह्यांना सुद्धा ह्या गेट चा प्रचंड मनस्ताप होतो.गमतीचा विषय म्हणजे 2014 ला नामदार नितीन गडकरी ह्यांनी या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आहे.तरी मागील 8 वर्षात घोड कुठं पेंड खाताय हा प्रश्न जनता आता विचारात आहे.रेल्वे गेट हे मरणाचे द्वार झाले असून हा अत्यंत जिवाहळ्याच्या विषयाला हात घातल्या बद्दल जनतेत किसान सभेचे कौतुक होताना दिसत आहे.