मेंदी काढण्यासाठी मुलीला घरून नेले पण परत आणलेच नाही
दिनांक २७/०४/२०२२ रोजी दुपारी १ वाजता खुमगाव बुर्टी येथे एक अजब घटना घडली. व त्याची तक्रार दिनांक ०५/०५/२०२२ रोजी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी पोलीस स्टेशन नांदुरा मधे देण्यात आली.याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी विजय सापुर्डा सावळे वय ४३ वर्ष हे घरी हज़र असतांना मयुर संजय फुटवाईक हा माझ्या घरी आला व माझ्या मुलीस आवाज देवुन म्हणाला की माझ्या मालकाच्या घरी गोद भराईचा कार्यक्रम आहे तिथं मेंदी काढायला चाल.नंतर हिला मेहंदी काढणे करीता सोबत घेवुन जातो म्हणुन तिने त्यास होकार दिला. तेव्हा आरोपी हा मुलीला सोबत घेवुन गेला .
तेव्हापासुन मुलगी घरी परत आली नसल्याने फिर्यादीने आरोपीस फोन लावला असता त्याचा फोन बंद होता. फिर्यादीने त्याचे घरी जावुन पाहीले असता तो घरी नव्हता. त्यांचे घरी विचारले असता त्यांनी सांगितले की आरोपी कोठे गेला हे आम्हास माहीती नाही. असे सांगीतल्याने फिर्यादीने मुलीचा शोध आज पर्यंत घेतला असता मुलगी मिळुन आली नाही अशा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून वरुन ना.पो.का. आघाव यांनी अपराध कलम ३६३ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास मा.पोलीस निरीक्षक साहेब यांचे आदेशाने सहाय्यक फौजदार श्री चंद्रकांत मोरे यांचेकडे देण्यात आला.