राष्ट्रीय लोक जन शक्ती पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष पदी संजय दाभाडे यांची निवड
मलकापूर
मलकापूर 16/5/22 येथील सामाजिक कार्यकर्ते संजय दाभाडे यांची राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान केंद्रीयमंत्री मा.ना. पशुपतीकुमार पारस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर काम करीत आहे . फुले- शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर पक्षाचे काम चालू आहे .
दिवंगत राष्ट्रीय नेते संस्थापक रामविलास पासवान यांनी हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थापन केलेला आहे . या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवि गरुड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पक्षाची बांधणी बुलढाणा जिल्हा व सभोवतालच्या परिसरात पंचक्रोशीत करावी , याकरीता मलकापूर येथील संजय दाभाडे यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून पुढील तीन वर्षाकरीता निवड करण्यात आली आहे . तर संजय दाभाडे यांना नियुक्तीपत्र देताना महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे त्यावेळी प्रदीपभाऊ नारखेडे आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.