Breaking News
recent

अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक एक ठार एक गंभीर जखमी



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर 13/5/22 येथे अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दी. 13 मे रोजी सकाळी 12 च्या सुमारास घडली आहे. सविस्तर असे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जवळील पाचपांडे पेट्रोल पंपाजवळ मोटर सायकल MH.28 AA 7208 डिस्कवर या मोटर सायकल ने डबल सीट मलकापूरकडून झोडगा येथे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वैभव चव्हाण वय 18 राहणार झोडगा तालुका मलकापुर हा जागीच ठार झाला असून सोनू चव्हाण वय 21 रा.झोडगा तालुका मलकापुर हा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्या जवळच्या लोकांनी दोघां जखमींना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल केले असता वैभव चव्हाण वय 18 याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे तर सोनू चव्हाण वय 21 हा गंभीर जखमी आहे.

Powered by Blogger.