जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया एसीबीच्या जाळ्यात
सागर झनके जळगांव जा
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वनपरिक्षेत्र नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते,आता येथे कार्यरत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. कटारिया यांना 25 हजारांची लाच स्वीकारताना बुलडाणा एसीबीच्या पथकाने दिनांक 13 मेच्या सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयातच रंगेहात पकडले आहे. सदर एसीबीच्या कारवाईमुळे संपूर्ण वन विभाग हादरुन गेला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी भगतराम द्वारकादास कटारिया वय 47 वर्ष यांच्याविरोधात पंचगव्हाण येथील 32 वर्षीय इसमाने लाचेची मागणी केल्याची तक्रार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
यातील तक्रारदार यांच्या मालकीचे टाटा 709 हॅलो विवाहं दिनांक 10 मे रोजी लाकुड वाहतूक करताना मिळून आल्याने वनविभागाचे कर्मचारी देवकर यांनी वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोद येथे जमा केले होते. तक्रारदार यांनी वाहन सोडविण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी कटारीया यांची भेट घेतली असता कटारिया यांनी स्वतःसाठी सात हजार रुपये व इतरांन करीता 12000 व दंडाची रक्कम सहा हजार अशी एकूण 25 हजार रुपयांची मागणी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी दरम्यान लाच मागणी बाबत खात्री करण्यात आली.